Love with one, marrage with the other 
विदर्भ

लग्नाचे आमिष दाखवून केले महिलेचे शोषण, परंतु ऐनवेळी घेतली ही भूमिका 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : एक 35 वर्षीय महिला आपल्या 14 वर्षांच्या मुलासह पतीपासून वेगळी राहत असताना सोशल मीडियावरून तिचे एका युवकासोबत सूत जुळले. त्यानेही तिला लग्नाचे आमिष दाखवून, तिचा लैंगिक छळ केला. परंतु, ज्यावेळी प्रत्यक्ष बोहल्यावर चढण्याची वेळ आली तेव्हा त्याच्या गळ्यात वरमाला टाकणारी दुसरीच निघाली. 

विशाल बाबू साठे (वय 32, रा. चुरणी) या युवकाविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. तो अद्याप पसार आहे. पीडित महिला मुलासोबत 2016 पासून भाड्याच्या खोलीत राहत होती. मोबाईलवरून फेसबुक चॅटिंग करत असताना ती विशालच्या प्रेमात पडली. तोही तिच्या भेटीसाठी अमरावतीत येऊन, तिच्याशी हितगूज करीत होता. सोशल मीडियावर जुळलेल्या प्रेमामुळे लग्न करण्याचे आमिष विशालने महिलेस दाखविले. 

तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने आपल्या विवाहित प्रेयसीकडून पैसेही उकळले. 7 जून 2020 रोजी आठवड्यानंतर परत येतो. त्यानंतर लग्न करू, असा निरोप देऊन त्याने एका मुलाची आई असलेल्या विवाहितेची साथ सोडली.

चिखलदरा तालुक्‍यातील गावी जाऊन दुसऱ्याच युवतीसोबत लग्न केले. त्यानंतर विशालने 16 जून रोजी त्याच्या स्वत:च्या फेसबुकवर लग्नाचा फोटो टाकला. हा फोटो बघून पारा चढलेली महिला त्याच्या चिखलदरा तालुक्‍यातील गावी पोचली. 

चौकशी केली असता, ज्याच्यावर तिने विश्वास टाकला, त्याने तिची साथ सोडून दुसरीसोबत लग्न केल्याची अमरावतीच्या महिलेची खात्री पटली. त्यामुळे तिने थेट गाडगेनगर ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी विशालविरुद्ध शुक्रवारी (ता. 19) अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. विशाल यास अटक झाली नसल्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी स्पष्ट केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Latest Crime : इचलकरंजीच्या तारदाळमधील दर्गा चौकात राजकीय वाद उफाळला, थेट चाकूने छाती, पोटावर वार केले अन्

Chef Kunal Kapoor: डाएट करताय पण तेच ते बेचव खाऊन कंटाळा आलाय? मग शेफ कुणाल कपूरची फायबर रिच मिलेट खिचडी आजच ट्राय करा

Income Tax Rules: पतीचे पैसे, पत्नीच्या नावावर SIP! मग टॅक्स कोण भरणार आणि किती लागेल? जाणून घ्या आयकर नियम सोप्या भाषेत

लग्नानंतर 15 दिवसांतच अभिनेत्याने आई आणि बायकोला घरात कोंडलं; "एकटं राहण्याची सवय.."

ESMA Act : भारत सरकारने गॅस तुटवड्यामुळे लागू केला एस्मा कायदा, LPG वितरणावर राहणार नियंत्रण, साठेबाजांची खैर नाही

SCROLL FOR NEXT