"ते' दृष्य पाहून मजुराची गेली तळपायातली आग मस्तकात, केली शेतमालकाची हत्या, काय होते कारण...

file
file

भिवापूर (जि.नागपूर) : दारुच्या नशेत मजूराच्या पत्नी व मुलीला मारहाण करणा-या शेतमालकास रागात आलेल्या मजुराने काठीने बदडून यमसदनी धाडले. ही घटना रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास नवीन जवराबोडी येथे घडली. राजेश उर्फ मुन्ना कांबळे (वय44,रा. नागपूर) असे मृताचे नाव आहे. मुन्ना हा गुन्हेगारी प्रवृतीाचा असून त्याच्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद आहे.

मुन्ना व लक्ष्मण यांच्यात होता वाद
मुन्ना कांबळे याचे जवराबोडी येथे शेत आहे. या शेतावर आरोपी लक्ष्मण पुराम व त्याची पत्नी मागील सात आठ वर्षांपासून मजुरीची कामे करायची. त्यांना दोन मुली असून एकीचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले. लहान मुलगी आई वडिलांसोबत राहून जवराबोडी येथे शिक्षण घेत आहे. गत वर्षी मुन्ना व लक्ष्मण यांच्यात वाद निर्माण झाल्याने लक्ष्मण व त्याच्या पत्नीने वर्षभरापासून मुन्नाकडे कामाला जाणे बंद केले होते. याचा मुन्ना मनात राग धरुन होता.

मुन्नाने केली पत्नी व मुलीला मारहाण
रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुन्ना आरोपी लक्ष्मणच्या घरी गेला. यावेळी तो दारुच्या नशेत टुन्न होता. घरी लक्ष्मणची पत्नी व मुलगी दोघेच होते. लक्ष्मण कामावरून परतलेला नव्हता. ही संधी साधून घरी जाताच मुन्नाने वाईट नजरेने मुलीला छेडण्याचा प्रयत्न केला. त्यावर
लक्ष्मणच्या पत्नीने मध्ये पडून त्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु दारुच्या नशेत तर्र असलेल्या मुन्नाने आईच्या विरोधाला न जुमानता तिलाही मारहाण केली. हा प्रकार सुरु असतानाच शेतीच्या कामाला गेलेला लक्ष्मण घरी परतला. त्याचा राग अनावर झाला. परंतु रागावर आवर घालत त्याने मुन्नाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र मुन्नाने त्यालाही मारहान केली. त्यामुळे संतापलेल्या लक्ष्मनने अंगणात पडलेल्या काठीने मुन्नाच्या डोक्‍यावर वार करुन त्याला जागीच ठार केले.

अधिक वाचा : अरे देवा...टाळेबंदीतही 25 लाख लोक करणार जेलभरो आंदोलन, काय आहे प्रकार?

दिली गुन्हयाची कबुली
या घटनेनंतर आरोपी लक्ष्मण पत्नी व मुलीसोबत पोलिस ठाण्यात गेला व घडलेल्या गुन्ह्याची
माहिती दिली. एपीआई शरद भस्मे यांनी लगेच जवराबोडी गाठून मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह
ऊत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

कोण होता मुन्ना?
आरोपी मुन्ना कांबळे हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी होता. त्याने2014मध्ये उमरेड विधानसभा क्षेत्रातून निवडणूक निवडणूक लढविली होती. गुन्हेगारी प्रवृत्तीचा असलेल्या मुन्नाविरुद्ध अनेक गुन्ह्याची नोंद आहे. त्याच्या गुंडप्रवृत्तीला कंटाळलेल्या भिवापूर व जवराबोडी येथील गावक-यांनी दोन वर्षांपूर्वी तहसिल कार्यालय व पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून त्याला हद्दपार करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्याला एक वर्षाकरीता नागपूर जिल्ह्यातून तडीापार करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com