gunfire
gunfire 
विदर्भ

विवाहितेवर लग्नासाठी दबाव; पुसद येथे गुंडाने केला गोळीबार 

सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : सूत जुळलेल्या विवाहित महिलेने आपल्यासोबत लग्न करावे, या हेतूने दहशत पसरविण्यासाठी एका कुख्यात गुन्हेगाराने सोमवारी (ता. 18) रात्री येथील शिवाजी वॉर्डात पिस्तुलातून जमिनीवर गोळीबार केला. पुसद शहर पोलिसांनी संशयित शेख अख्तर शेख मुख्तार ऊर्फ समीर कुरेशी या 32 वर्षीय कुख्यात गुंडाला पिस्तुलासह अटक केली. 

महिलेशी सूत जुळले 
कुख्यात गुंड समीर कुरेशी हा पुसद येथील राम-रहिम नगरात राहतो. तो स्वतः विवाहित असून, त्याचे शिवाजी वॉर्डातील एका विवाहित महिलेशी काही वर्षांपूर्वी सूत जुळले होते. या महिलेने पतीला तलाक देऊन आपल्याशी लग्न करावे, या हेतूने दबाव टाकण्यासाठी पिस्तुलातून गोळीबार केला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

पिस्तूल आणि चार गोळ्या जप्त 
समीरकडून पिस्तूल आणि चार गोळ्या जप्त केल्या. त्याच्याजवळ दोन आधार कार्ड असून, त्यावर वेगवेगळी नावे आहेत. पोलिसांनी त्याची पार्श्‍वभूमी तपासली असता अनेक घरफोडी प्रकरणात त्याचा हात असल्याचे समोर आले. त्याच्याकडून यापूर्वी एक पिस्तूलसुद्धा जप्त करण्यात आले होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT