Medical services in Amravati save life of child in Melghat  
विदर्भ

कौतुकास्पद! वैद्यकीय सेवा 'त्या' चिमुकल्यासाठी ठरली देवदूत; शर्थीचे प्रयत्न करून वाचवला जीव 

सकाळ डिजिटल टीम

अमरावती ः मेळघाटात आरोग्याबाबत नेहमीच ओरड होत असते. मात्र, या नकारात्मक वातावरणातसुद्धा आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीतून एका बालकाला नवजीवन मिळाले. 

‘प्ल्युरल इन्फ्युजन’चे निदान झालेल्या मेळघाटातील सहा महिन्याच्या राकेश कासदेकर या चिमुकल्यावर आरोग्य विभागाच्या कार्यतत्परतेमुळे वेळीच शस्त्रक्रिया झाल्याने त्याला पुनर्जन्म मिळाला आहे. वैद्यकीय सेवा देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

चिखलदरा तालुक्‍यातील टेम्ब्रु येथील अवघ्या सहा महिन्याच्या राकेश रामा कासदेकर याला १४ जानेवारी रोजी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. वैद्यकीय उपचारांसाठी राकेशचे कुटुंबीय तयार नव्हते. ही माहिती कळताच गावातील आरोग्य सेविका स्मिता राऊत, आशा सेविका सुनीता कासदेकर यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन करून बाळाची डॉ. सागर कोगदे यांच्याद्वारे वैद्यकीय तपासणी करून घेतली. तपासणीअंती बाळाची आरोग्य स्थिती चांगली नसल्याचे आढळले. 

त्यानंतर तत्काळ रुग्णवाहिका बोलावून चुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी राकेशच्या आईवडिलांना धीर व विश्वास दिला. चुर्णी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. दारसवार यांच्या सल्ल्यानुसार बाळाला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. त्यासाठी सर्व संदर्भ सेवा कुटुंबाला उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्हा रुग्णालयात भरती झाल्यावर बालरोगतज्ज्ञामार्फत बाळावर तत्काळ वैद्यकीय उपचार व तपासणी सुरू करण्यात आली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMO Shift to Seva Teerth : प्रशासनात ऐतिहासिक बदल ! पंतप्रधान कार्यालय "सेवा तीर्थ" मध्ये स्थलांतरित, साऊथ ब्लॉकमध्ये आज शेवटची बैठक

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घेतला पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा

Ladki Bahin Yojana e-KYC : लाडक्या बहिणींना गुड न्यूज! आता एकदमच मिळणार 6000 रुपये; 'ई-केवायसी'साठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची घर घर थांबली! Mumbai Indians ची आडकाठी, तरीही RCB ला मिळालं हक्काचं होम ग्राऊंड

योगींचा गुंडांना थेट इशारा! होळीत राडा केला तर सरळ जेलमध्ये जाणार; सणासुदीच्या काळात यूपीमध्ये 'हाय अलर्ट'

SCROLL FOR NEXT