पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत आरोपींना जेरबंद केले. भावाचा मृत्यू जिव्हारी लागल्याने डॉ. मत्ते यांच्यावर गुप्ती अन सुरी चालविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 
विदर्भ

थरारक! भावाचा मृत्यू लागला त्याच्या जिव्हारी; डॉक्टरांवरच गुप्ती आणि चाकूनं केले वार

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ): दीपक चौपाटी परिसरातील डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर सोमवारी (ता.5) दुपारी 1 वाजताच्या सुमारास चौघांनी जीवघेणा हल्ला चढविला. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ माजली. पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत आरोपींना जेरबंद केले. भावाचा मृत्यू जिव्हारी लागल्याने डॉ. मत्ते यांच्यावर गुप्ती अन सुरी चालविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अमर हनुमान पेंदोर (रा. रंगनाथनागर, वणी), शुभम ओमप्रकाश खंडारे (रा. वास्तू पार्क लालगुडा), सुप्रीम मिलिंद उमरे (रा. भालर वसाहत), प्रज्योत महेश उपरे (रा. तेली फैल) असे अटकेतील संशयितांची नावे आहेत. डॉ. पद्माकर मत्ते यांच्या क्‍लिनिकमध्ये उपचार घेत असलेल्या आकाश हनुमान पेंदोर (वय21, रा. रंगनाथनगर) याचा 18 जानेवारीला मृत्यू झाला होता. त्या तरुणावर एक दिवसापूर्वी डॉ. मत्ते यांनी उपचार केल्यानंतर घरी जाण्यास सांगितले. 

काही कालावधीनंतर त्याची प्रकृती गंभीर झाली व तो दगावला. उपचारात कसूर केल्याचा ठपका ठेवत मृताच्या नातेवाइकांनी क्‍लिनिकची तोडफोड करीत डॉक्‍टर मत्ते यांना मारहाण केली होती.  हे प्रकरण पोलिसात पोहचले होते.

डॉ. मत्ते यांनी उपचारात कसूर केल्यानेच भावाचा मृत्यू झाल्याचा ग्रह अमर याने केला. भाऊ आकाशच्या मृत्यूचा बदला घेण्याचे त्याने ठरविले आणि सोमवारी मित्रांसोबत संगनमत करून डॉ. मत्ते यांच्यावर सशस्त्र हल्ला चढविला. दुपारी रुग्ण बनून आलेल्यांनी गुप्ती व सुरीने सपासप वार केले आणि मिळेल त्या रस्त्याने पसार झाले होते. 

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार वैभव जाधव पोलिस पथकासह घटनास्थळी पोहचले. घटनेचे गांभीर्य बघता तातडीने पथके रवाना केली. गोपनीय महितगारांच्या मदतीने आरोपींचा छडा लावताना भालर परिसरातील जंगलात दडलेल्या आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करण्यात आला. आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT