'तो' वाघ नव्हे, तर बिबट्याच, एक महिन्यापासून पसरली होती वाघ असल्याची अफवा

leopard in taroda area of manjarkhed kasba in amravati
leopard in taroda area of manjarkhed kasba in amravati

मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : गत एक महिन्यापासून मांजरखेड कसबा व बासलापूर शेतशिवारात वाघाची दहशत पसरली असल्याने शेतकरी धास्तावला आहे. गत दोन दिवसांपूर्वीसुद्धा तरोडा शिवारातील शेतात एका वासराची शिकार ही त्या वाघानेच केल्याच्या चर्चेला उधाण आलेले आहे. मात्र, तो प्राणी वाघ नसून बिबट असल्याचे स्थानिक वनविभागाचे म्हणणे आहे.

तीन मार्चला बासलापूर येथील शेतकरी अमोल आखरे यांनी शेतात रात्री आठ ते 10 वाजेदरम्यान वाघ पाहिला तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही सदर वाघाचे दर्शन झाल्याचे निवेदन वनविभागाला दिले होते. तसेच तीन एप्रिल रोजी भारत बोबडे यांच्या तरोडा शिवारातील शेतात असलेल्या वासराची शिकार वाघानेच केली असल्याचे भारत बोबडे व स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भीतीमुळे शेतमजूर कामावर येत नसल्याने शेतीची  कामे ठप्प झालीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे तसेच वन्यप्राण्याचा बंदोबस्त करून परिसर दहशतमुक्त करण्याचे निवेदन स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाला दिले आहे.

यासंदर्भात वनविभागाला विचारणा केली असता या परिसरात वाघ या प्राण्याचे कुठलेही चिन्हे आढळलेली नाहीत. अधिक तपासणीसाठी रेस्क्‍यू टीम दौरा केलेला आहे. शिवाय या भागात वन्यप्राण्यांवर नजर ठेवण्यासाठी जंगलामध्ये दोन ट्रॅप कॅमेरे लावले असल्याचे चांदूररेल्वेचे आरएफओ आशीष कोकाटे यांनी सांगितले आहे.

प्राण्यांसाठी मुबलक पाणी -
चांदूररेल्वे तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या जंगल भागात दोन कृत्रिम पाणवठे असून नैसर्गिक स्वरूपात सावंगा विठोबा, बासलापूर, सरस्वती, भिवापूर आदी तलाव उपलब्ध आहेत. दोन्ही पाणवठ्यांवर मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने जंगलातील प्राणी गावात येण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com