murder sakal
विदर्भ

मित्रास भेटण्यासाठी गेलेल्या नेर येथील तरुणाचा खून

सायंकाळी साडेसात वाजता मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे आईला सांगून घरातून निघाला होता.

गणेश राऊत

नेर : शहरातील हनुमाननगरातील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा गळा आवळून खून केल्याचे आज शनिवारी (ता.29) दुपारी 12 वाजता लासीना ते घुई शिवारात उघडकीस आले. हा तरुण काल शुक्रवारी (ता.28) सायंकाळी साडेसातला मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे आईला सांगून घरून निघाला होता.

याबाबत नेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश शालिकराव भोंडे (वय 27, रा. हनुमाननगर, नेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. योगेश हा काल शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे आईला सांगून घरातून निघाला होता. मात्र, आज शनिवारी दुपारी 12 वाजता योगेशचा मृतदेह लासिना ते घुई शिवारात रस्त्याच्या कडेला स्थानिक नागरिकांना दिसला.

स्थानिकांनी ही माहिती लाडखेड पोलिसांना दिली. त्यानंतर दारव्हा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर, लाडखेडचे ठाणेदार रामकृष्ण भाकडे, नेरचे प्रभारी ठाणेदार बबन कराळे हे घटनास्थळावर दाखल झालेत. यावेळी रस्त्याच्या कडेला आढळून आलेल्या मृताच्या गळ्यावर दोरीच्या खुणा व छातीवरही जखमांच्या खुणा आढळून आल्या. चेहऱ्यावर रक्ताचे डाग व शर्ट पूर्णतः फाटल्याने ही आत्महत्या नसून, खून असल्याचा संशय पोलिसांना आला. घटनास्थळाच्या पंचनाम्यावरून लाडखेड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सोळा तासांपूर्वी निघाला घरून

योगेश भोंडे हा शांत व संयमी होता. मित्रांचा गोतावळा फार कमी असल्याने त्याचा इतरांशी संपर्क जास्त नव्हता. शुक्रवारी सायंकळी साडेसात वाजता तो त्याच्या आईला ‘एका मित्राला भेटून येतो’, असे सांगून घराबाहेर पडला. मा,त्र रात्रीपर्यंत तो घरी परतला नसल्याने घरच्यांची चिंता वाढली. घरच्यांनी रात्रीच नातेवाईक व मित्रमंडळीकडे सर्वत्र शोध घेणे सुरू केले. मात्र, शनिवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान लासीना ते घुई शिवारात रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह (dead body)आढळून आला. त्यामुळे योगेशच्या खुणा मागे कोण व खुनाचा कारण नेमके काय, हे शोधण्याचे आव्हान नेर(ner) पोलिसांसमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khan Sir Firing Case: गोळीबारप्रकरणी खान सरांनाच अटक होण्याची शक्यता; दोन्ही अंगरक्षकांनी गोळीबाराची दिली कबुली

Vaibhav Sooryavanshi: Dhoni आणि 'गँग्स ऑफ वासेपूर'नंतर आता Vaibhav सूर्यवंशी ऋद्धिमा पाठकचा खळबळजनक खुलासा, Video Viral

Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

SCROLL FOR NEXT