3 months pregnant woin Nagpur man filed FIR against her boyfriend  
नागपूर

घटस्फोटीत महिला झाली तीन महिन्यांची गर्भवती; प्रियकराचं सत्य समोर येताच उचललं कठोर पाऊल 

अनिल कांबळे

नागपूर ः पतीपासून घटस्फोट घेऊन माहेरी राहत असलेल्या २८ वर्षीय महिलेला तीन महिन्यांची गर्भधारणा झाली. त्यामुळे महिलेने आपल्या विवाहित प्रियकराविरूद्ध बलात्काराची तक्रार केली. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकराला अटक केली. राहुल अर्जुन वैद्य (३२, रा. हजारीपहाड, वायूसेनानगर) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रिया (बदललेले नाव) प्रतापनगर परिसरात राहत असून हिचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिच्या पतीसोबत वाद झाल्यानंतर तिने पतीपासून घटस्फोट घेतला. ती माहेरी राहायला लागली. तिची मैत्रीण आरोपी राहुल वैद्य याच्या कार्यालयात कामावर होती. 

बेरोजगार असलेली रियाने मैत्रिणीला काम शोधण्यास सांगितले. तिने आपला बॉस आरोपी राहुल वैद्य याची भेट घालून दिली आणि नोकरी देण्यासाठी विनंती केली. त्याने तिच्या बायोडाट्यावरून तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि तिच्याशी चॅटिंग करायला लागला. दोघांची मैत्री झाली. त्याने तिला अनेकदा कार्यालयात भेटायला बोलावले. तिला जाळ्यात ओढून नवीन कार्यालय उघडल्यावर मॅनेजर पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्याने स्वतःला अविवाहित असल्याचे रियाला सांगितले. 

१८ ऑगस्ट २०१९ मध्ये राहुलने तिला कार्यालयात बोलावले. तिला प्रपोज करीत तिला लग्नाची मागणी घातली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर तिला शारीरिक संबंधाचा मागणी केली. तिने नकार देताच त्याने कार्यालयात मॅनेजर पदावर नोकरी देण्याचे आमिष दिले. त्याच्या आमिषाला बळी पडून तिने शारीरिक संबंधासाठी होकार दिला. तेव्हापासून दोघांचे अनैतिक संबंध सुरू होते.

तो निघाला विवाहित

घटस्फोटीत रिया प्रेमसंबंधास नकार देत असल्यामुळे राहुल वैद्यने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्या नातेवाईकांची भेट घेऊन लग्न करण्याची बोलणी केली. दरम्यान ती तीन महिन्यांची गर्भवती झाली. त्यामुळे तिने लग्नाचा तगादा लावला. त्याने थेट विवाहित असून दोन मुल असल्याचे रियाला सांगितले. त्यामुळे रियाच्या पायाखालची जमीन सरकली. फसगत झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT