esakal | हादरवणारी घटना! पाणीपुरी खाण्याचा मोह बेतला जीवावर; तब्बल ९५ जणांचा जीव धोक्यात; एका मुलीचा मृत्यू  
sakal

बोलून बातमी शोधा

pani puri

भेंडाळा येथील राखी रामदास सतीबावणे बारा वर्षीय मुलीचा आज, मंगळवारी सकाळी पवनी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला. त्यामुळे भेंडाळा गावात आरोग्य विभागाची चमू दखल झाली. उलट्या आणि हगवण असणाऱ्या लोकांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

हादरवणारी घटना! पाणीपुरी खाण्याचा मोह बेतला जीवावर; तब्बल ९५ जणांचा जीव धोक्यात; एका मुलीचा मृत्यू  

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पवनी (जि. भंडारा) ः तालुक्‍यातील भेंडाळा येथे रविवारी आठवडी बाजारात पाणीपुरी आणि नुडल्स खाल्ल्याने एकूण 95 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या सगळ्यांना हगवण, उलटी आणि ताप अशी लक्षणे होती. यातच आज, मंगळवारी एका बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली असून, चमू गावात दाखल झाली आहे. दरम्यान, बाधित सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुरुचरण नंदागवळी यांनी सांगितले.

भेंडाळा येथील राखी रामदास सतीबावणे बारा वर्षीय मुलीचा आज, मंगळवारी सकाळी पवनी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला. त्यामुळे भेंडाळा गावात आरोग्य विभागाची चमू दखल झाली. उलट्या आणि हगवण असणाऱ्या लोकांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावात हॉटस्पॉट...

रविवारी भेंडाळा येथे आठवडी बाजार भरते. त्याठिकाणी नुडल्स आणि पाणीपुरी खाणाऱ्या नागरिकांना उलट्या आणि हगवणचे लक्षण दिसून आले. त्यामुळे हा मृत्यू झाल्याचे कुटुंबातील लोक सांगत आहेत. गावातील 95 जणांना ही विषबाधा झाली असून, 19 जणांना सध्या उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल करण्यात आले आहे.

भेंडाळा येथे रविवारी आठवडी बाजार होता. आठवडी बाजारात गुपचूप आणि चायनीजचे ठेले लागले होते. ज्या लोकांनी गुपचूप आणि नूडल्स खाल्ले अशा सर्व जणांना सोमवारी त्याचा त्रास जाणवू लागला. रामदास सतीबावणे यांच्या कुटुंबातील मुलांनीसुद्धा हे न्युडल्स खाल्ले होते. त्यानंतर सोमवारपासून या मुलांना उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाला होता. सोमवारी आसगाव येथील डॉ. वैरागडे यांच्याकडे उपचार घेण्यात आले होते. परंतु, आज, मंगळवारी राखीची प्रकृती अधिक खालावल्याने वडील तिला उपचारासाठी पवनी येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. 

भूक लागली आहे, जेवण कुठं मिळेल जी? खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांची पायपीट

राखी मृत्यूची बातमी गावात पसरली आणि हळूहळू ही बाब समोर आली. गावातील बरेच लोकांना सध्या उलटी आणि हगवणीचा त्रास सुरू असल्याने त्यांच्यावर घरी व पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणा गावात पोहोचली असून, प्रत्येक घरी तपासणी करून माहिती गोळा करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचे गांभीर्य ओळखून घेतले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top