Aadhar card has increased headaches for parents of Anganwadi children 
नागपूर

आधार कार्ड काढताय? थांबा १५ दिवस!

चंद्रशेखर महाजन

नागपूर : तीन ते सहा वर्षांतील आत मुलांना अंगणवाडीतील धान्य घेण्यासाठी सरकारने आधार कार्डची सक्ती केली आहे. त्याशिवाय धान्य मिळणार नाही, अशी तंबी सेविकांनी दिली. त्यामुळे पालक आधार केंद्रावर धाव घेत आहेत. मात्र, तिथे गेल्यानंतर अपॉइंटमेंट घ्यावी लागते. ऐवढेच नव्हे तर त्यासाठी १५ पेक्षा अधिक दिवसांची प्रतीक्षा यादी असल्याने पालकांचे डोके गरगरायला लागले आहेत.

राज्य शासनातर्फे अंगणवाडीतील सहा वर्षांखालील मुलांना धान्याची कीट देण्यात येते. या योजनेतून लाखो बालकांना लाभ मिळत आहे. मात्र, योजनेच्या लाभासाठी तीन ते सहा वयोगटातील बालकांना आधार कार्ड सक्तीचे केले आहे. कोरोनाच्या काळात आधार केंद्र बंद असल्याने पालकांना मुलांचे आधार कार्ड काढता आले नाही. काही दिवसांपूर्वी हे केंद्रे सुरू झालीत.

नागपूर शहरात झोननिहाय केंद्रे आहेत. त्यावर गर्दी आहे. मात्र, शासनाने कार्ड काढण्यासाठी अपॉइंटमेंट सक्तीची केली आहे. यासाठी इंटरनेटवर जाऊन पालकांना आधी सर्व माहिती असलेला अर्ज भरावा लागतो. त्यानंतर त्याला अपॉइंटमेंटचा अर्ज भरावा लागतो. हा अर्ज भरताना पालकांची दमछाक होत आहे.

कारण, १५ दिवसांपर्यंत प्रतीक्षा यादी पूर्ण झाल्याचे दिसून येते. ज्या भागात पालक राहतात, त्याच भागातील केंद्र दिसतात. त्यावर रोज एका विशिष्ट वेळीच अपॉइंटमेंट मिळत असल्याची माहिती आहे. परंतु, यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागत आहे.

दररोज जावे लागते इंटरनेट कॅफेवर

अंगणवाडीतील पोषण आहार कीट बालकांच्या आरोग्यासाठी देण्यात येत असली तरी त्याचा मनस्ताप मात्र पालकांना होत आहे. आधार कार्ड नसल्यामुळे कीट धान्य तर मिळत नाही. मात्र, अपॉइंटमेंटसाठी दररोज त्यांनी इंटरनेट कॅफेवर जावे लागते. यात त्याचा दररोज एक तासांपेक्षा अधिक वेळ वाया जात असल्याने पालक संप्तत झाले आहेत. ‘कीट नको पण आधार कार्ड आवर’ अशी अवस्था त्यांची झाली आहे.

नागपूर शहरात ८६६ अंगणवाडी केंद्र

नागपूर महानगरपालिका क्षेत्रात ८६६ अंगणवाडी केंद्र आहेत. यातील अनेक बालकांचे आधार कार्ड काढण्यात आले नाही. हे बालक ३ ते ६ वर्ष वयोगटातील आहेत. त्यांना आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. कार्ड काढण्यासाठी पालकांना वारंवार येरझाऱ्या कराव्या लागत असल्याने ते त्रस्त झाले आहेत.

आधार कार्ड काढण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात यावे
केंद्रावर अंगणवाडीतील बालकांना अपॉइंटमेंटशिवाय आधार कार्ड काढण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात यावे, अशा सूचना संबंधित केंद्रांना देण्यात येतील. यासंदर्भात पाठपुरावा करावा, असेही आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात येतील.
- अमर बागडे,
सभापती, धरमपेठ झोन, मनपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT