accidents were increased by overgrown trees 
नागपूर

अरे हे काय, सौंदर्यीकरण उठले जीवावर, वाढले अपघात

नरेंद्र चोरे

नागपूर  : शहराचे सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने उड्डाणपूल व मेट्रो रेल्वेखालील डिव्हायडरवर जागोजागी शोभेची झाडे लावण्यात आली. मात्र, नियमित देखभाल होत नसल्याने या झाडांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनधारकांचा निष्काळजीपणाही याला कारणीभूत ठरत आहे.

उपराजधानीला स्वच्छ, सुंदर व स्मार्ट बनविण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने जागोजागी वृक्षारोपण केले. उड्डाणपूल व मेट्रोच्या खाली डिव्हायडरवर शोभेची झाडे लावण्यात आली. प्रशासनाकडून नियमित देखभाल होत नसल्याने ठिकठिकाणची झाडे अस्ताव्यस्त वाढली आहेत. त्याचा फटका शहरातील वाहनधारकांना बसू लागला आहे. 

वाहने चालविताना अनेकवेळा ही झाडे डोळ्यांसमोर येत असतात. त्यामुळे समोरचे वाहन नीट दिसत नाही. परिणामतः अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून रोजच छोटे-मोठे अपघात होऊन वाहनधारक जखमी झाल्याचे दिसून आले आहे. विशेषतः रामदासपेठ, सिव्हिल लाइन्स, उत्तर अंबाझरी मार्ग, वर्धा रोडवर हे चित्र नियमित पाहायला मिळते. सर्वाधिक अपघात चौकांमध्ये होत आहेत.

तरुणाईचा बेलगामपणाही अपघातांना तितकाच कारणीभूत आहे. अनेक युवक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत भरधाव गाडी दामटताना दिसतात. रेड सिग्नल तोडून पुढे जाण्याच्या किंवा उजवीकडे वळण्याच्या प्रयत्नात समोरच्या वाहनाला धडकून स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात टाकतात. 

यात सर्वाधिक प्रमाण तरुण मुला-मुलींचे आहे. वेगाने टर्न घेण्याच्या प्रयत्नात अलंकार चौकात अलीकडच्या काळात अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत. एका घटनेत कारचालकाला दिलेल्या धडकेत हेल्मेट न घातलेला दुचाकीस्वार व मागे बसलेल्या तरुणीला गंभीर दुखापत झाली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी डिव्हायडरवरील झाडांची नियमित कटिंग होणे आवश्यक आहे. शिवाय वाहतूक पोलिसांनीही सतर्क राहून बेलगाम तरुणांवर आवर घालणे गरजेचे आहे. 
  
संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT