according to candidate few money allot for grampanchayat election 
नागपूर

उमेदवारांनो, ग्रामपंचायत निवडणुकीत करता येणार नाही पैशांची उधळपट्टी

नीलेश डोये

नागपूर : निवडणुकीत प्रचारासाठी वारेमाप पैशाची उधळपट्टी केली जाते. पैसा खर्च करण्यासाठी स्पर्धाच लागली असते. मात्र, ग्राम पंचायत निवडणुकीत वेगळेचे चित्र आहे. येथे सदस्य संख्येच्या आधारावर अवघे २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचा खर्च उमेदवारांना करता येणार आहे. आचारसंहितेनुसार तसे बंधने घालण्यात आली आहे. 

कोरोनामुळे लांबलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जवळपास आठ महिन्यानंतर होत आहेत. राज्यात पंधरा हजार ग्रामपंचायती असून जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीचे गणिते जुळवण्याची रणनीती आखणे सुरू झाले आहे. या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून दखल घेण्याची शक्यता आहे. या ग्राम पंचायती ताब्यात मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होणार नसून पारंपरिक पद्धतीने म्हणजे सदस्यांमधून होणार आहे. ही निवडणूक गावापुरती मर्यादेत असली तर मोठ्याप्रमाणात खर्च होतो. या निवडणुकीत उमेदवारास २५ ते ५० हजार रुपयापर्यंतचा खर्च करता येणार आहे. या मर्यादेपेक्षा जास्त पैसा खर्च करणाऱ्याचे सदस्यत्व धोक्यात येईल. आरक्षित वर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पोचपावती नामांकन पत्र दाखल करताना जोडावे लागणार आहे. 

सदस्यनिहाय खर्च  -

ग्रामपंचायत सदस्य संख्या उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा (हजार रुपये)
७ ते ९ २५
११ ते १३ ३५
१५ ते १७  ५० 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT