नागपूर

Paper Leak: MBBS परीक्षेचा पेपर फुटला ? ऐनवेळी बदलला पेपर, परीक्षेला पाऊणतास विलंब

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने बुधवारी (ता. आठ) घेतलेला एमबीबीएसचा अंतिम पेपर फुटल्याचे वृत्त आल्याने ऐनवेळी पेपर बदलविण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

MBBS Paper Leak: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने बुधवारी (ता. आठ) घेतलेला एमबीबीएसचा अंतिम पेपर फुटल्याचे वृत्त आल्याने ऐनवेळी पेपर बदलविण्यात आला. त्यामुळे परीक्षा पाऊणतास उशिराने सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा आज (ता. आठ) शेवटचा पेपर होता. या पेपरला चांगलाच गोंधळ उडाला. निर्धारित वेळापत्रकानुसार पेपर न घेता तब्बल पाऊणतास उशिराने परीक्षा सुरू करण्यात आली. अमरावतीसह नागपूर येथील परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला. यासंदर्भात माहिती देण्यास स्थानिक परीक्षा केंद्राधिकाऱ्यांनी नकार दिला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार ‘बायोकेमेस्ट्री’ विषयाचा दुसरा व अभ्यासक्रमातील अंतिम थेअरी पेपर होता.

पहिला थेअरी पेपर सोमवारी (ता. सहा) झाला. यावेळी द्वितीय पेपर एका परीक्षा केंद्रावर वितरित केल्या गेला. हा प्रकार लक्षात येताच तो विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात येऊन पहिला पेपर देण्यात आला. मात्र, बुधवारी (ता. आठ) असलेला पेपर सोमवारीच वितरित झाल्याने तो लीक झाला असावा, असा संशय वाढला होता.

दरम्यान, ही सूचना इतर परीक्षा केंद्रांना नसल्याने तेथे बुधवारी तोच पेपर विद्यार्थ्यांना देण्याची तयारी झाली होती. यादरम्यान वरिष्ठ पातळीवरून जुना (सोमवार सहा नोव्हेंबरला दिलेला) पेपर न देण्याचे आदेश आल्याने व नवीन पेपरसेट त्यावेळी केंद्रांवर उपलब्ध नसल्याने परीक्षार्थींना प्रश्नपत्रिकेसाठी ताटकळण्याची वेळ आली.(Latest Marathi News)

तब्बल पाऊणतासाने प्रश्नपत्रिकेचा दुसरा व नवीन सेट आल्यानंतर तो वितरित करण्यात आला. त्यामुळे परीक्षा विलंबाने सुरू झाली.अमरावतीमधील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दोन केंद्रे होती. दोन्ही केंद्रांवरील केंद्राधिकाऱ्यांनी व महाविद्यालयीन प्राचार्यांनी यासंदर्भात माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. एका केंद्रावर परीक्षाच नसल्याचे तर दुसऱ्या केंद्रावर विद्यार्थ्यांना सुट्या लागल्या असल्याचे कारण सांगण्यात आले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खडकवासला धरणसाखळीत अवघ्या १३ तासांत २.३६ टीएमसीची भर, वेगाने वाढतोय जलसाठा

Mumbai Local: पावसाचा हाहाकार! सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वे विस्कळीत, लोकल अर्धा तास उशिराने

Latest Marathi News Update: आंबेनळी घाट महिनाभर बंद, स्थानिकांचा विरोध

मृत्यूपूर्वी धर्मेंद्र हेमा मालिनी यांना काय म्हणाले होते? अभिनेत्रीचा खुलासा; सांगितलं ते गेल्यानंतर कसं राहतंय कुटुंब

Tukaram Mundhe Action : तुकाराम मुंढेंचा दणका! आता किराणा दुकानांतून सुटे खाद्यतेल अन् विनालेबल फरसाण गायब; व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT