Amravati Crime Esakal
नागपूर

Crime: भिक्षा दिली नाही म्हणून महिलेवर त्रिशूळाने केला वार, संतप्त नागरिकांनी भिक्षेकरी बाबाला विजेच्या खांबाला बांधलं

Woman Attacked by Monk: चिखलदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वस्तापूर गावात मांगेलाल बेठेकर या बाबाने भिक्षा न दिल्यामुळे महिलेच्या पोटावर त्रिशुळाने वार करीत त्यांना जखमी केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Monk Attacked Woman with Trident: चिखलदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वस्तापूर गावात मांगेलाल बेठेकर (वय ७५, रा. दुणी, ता. धारणी) या बाबाने भिक्षा न दिल्यामुळे ठकीबाई सोनूजी हेकडे या ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या पोटावर त्रिशुळाने वार करीत त्यांना जखमी केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. संतप्त ग्रामस्थांनी या बाबाला गावातील मुख्य चौकातील एका विजेच्या खांबाला बांधून ठेवले व पोलिस पाटलांना या घटनेची माहिती देण्यात आली.

रविवारी श्रीसंत गजानन महाराजांचा पालखी उत्सव, भजनकीर्तन असा कार्यक्रम पहाटे पाच वाजतापासून चिखलदरा तालुक्यातील वस्तापूर या गावात सुरू होता. दुपारपर्यंत सर्व गावकरी व भक्तगण श्रीसंत गजानन महाराजांच्या कार्यक्रमात व्यस्त होते.

नेमके याच वेळेत दुपारी तीन वाजताच्या सुमारास मांगेलाल बेठेकर हा बाबा हातात त्रिशुळ तर बगलेत मोठे गाठोडे घेऊन गावात भिक्षा मागत होता. भिक्षा मागत असताना गावातील सोनूजी हेकडे यांच्या घरी बाबा पोहोचला व भिक्षेची तसेच पैशाची मागणी केली असता ठकूबाईने बाबाला भिक्षा दिली, पण दिलेल्या भिकेत पैसे न दिल्यामुळे बाबाचे समाधान झाले नाही. (Latest Marathi News)

त्यामुळे महिलेसोबत त्याने वाद घातला व रागाच्या भरात त्याने जवळ असलेल्या त्रिशूलने महिलेच्या पोटावर वार करून जखमी केले. या घटनेने गावात चांगलीच खळबळ उडाली. नागरिकांनी या महिलेला तत्काळ टेम्ब्रूसोंडा येथील आरोग्यकेंद्रात नेऊन उपचार केले. दरम्यान, ग्रामस्थांनी या बाबाला गावातील मुख्य चौकात असलेल्या खांबाला कापडाच्या साह्याने बांधून ठेवले व पोलिसांना पाचारण केले.

चिखलदरा पोलिसांनी बाबाला ताब्यात घेतले. महिलेच्या तक्रारीनंतर बाबावर कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास पीएसआय सुरेश राठोड व जमादार प्रभाकर चव्हाण करीत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT