Chandigarh Deputy Mayor Elections: महापौरपदासाठी झाला होता गैरप्रकार! आता उपमहापौरपदाची निवडणूक भाजपनं जिंकली

चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीतील मोठ्या ड्राम्यानंतर आता भाजपनं उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली आहे.
Chandigarh Deputy Mayor Elections
Chandigarh Deputy Mayor Elections

नवी दिल्ली : महापौरपदाच्या निवडणुकीतील मोठ्या घोटाळ्यानंतर आता भाजपनं उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. ही निवडणुकही काँग्रेस-आम आदमी पार्टी आणि भाजप अशी थेट निवडणूक होती.

या निवडणुकीत वरिष्ठ उपमहापौरपदासाठी इंडिया आघाडीचे नगरसेवक गुरप्रीत सिंह गाबी आणि भाजपचे नगरसेवक कुलजीत सिंह संधू यांच्यामध्ये निवडणूक झाली. तर उपमहापौरपदासाठी इंडियाच्या निर्मला देवी आणि भाजपचे नगरसेवक राजिंदर शर्मा यांच्यामध्ये निवडणूक झाली. (Chandigarh Deputy Mayor elections BJP candidate Rajinder Sharma wins election of with 19 votes)

वरिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीत देखी आप आणि काँग्रेसच्या आघाडीचं एक मत रद्द झालं. तर या निवडणुकीत भाजपला १९ मतं आणि आघाडीला १६ मत मिळाली. तर एक मत रद्द झालं. असं सांगितलं जात आहे की, अकाली दलाचे हरदीप सिंह यांनी पुन्हा एकदा भाजपला मत दिलं आहे. (Latest Marathi News)

Chandigarh Deputy Mayor Elections
Asim Sarode Alleged Cm Eknath Shinde MLAs: एअर हॉस्टेसचा विनयभंग? गुवाहाटीमध्ये २ आमदारांना कुणी मारहाण केली? असीम सरोदे यांचे गंभीर आरोप

यापूर्वी ११ वाजून १२ मिनिटांनी मतदान संपलं. खासदार किरण खेर यांनी पहिल्यांदा मत टाकलं. त्यांनी मतदान करण्यापूर्वी नगरसेवक सौरभ जोशी त्यांच्याजवळ आले, यामुळं सभागृहात मोठा गोंधळ झाला. यावेळी आप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी आरोप केला की कोणताही नगरसेवक मतदानापूर्वी आपल्या जागेवरुन उठून मतदान करणाऱ्या व्यक्तीजवळ जाऊ शकत नाही. पण यानंतर महापौरांनी समजावल्यानंतर प्रकरण थंड झालं. (Marathi Tajya Batmya)

Chandigarh Deputy Mayor Elections
Pune Traffic Update News: पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; जड वाहनांना शहरात नो एंट्री, 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

असं होतं उपमहापौरपदाच्या निवडणुकीचं बलाबल?

भाजप - १७ नगरसेवक + १ खासदार

आप - १०

काँग्रेस - ७

अकाली दल - १

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com