नागपूर

तिने प्रेम सिद्ध करण्यासाठी केला न्यूड व्हिडिओ कॉल, अन्...

अनिल कांबळे

नागपूर : फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रियकराने प्रेम सिद्ध करण्यासाठी थेट ‘न्यूड व्हिडिओ कॉल’ करण्याची अट घातली. प्रेयसीने अतिविश्‍वास ठेवून व्हिडिओ कॉल केला. मात्र, प्रियकराने तो कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आर्यन ऊर्फ वैभव राजू आवारी (रा. हिंगणघाट, वर्धा) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षाची तरुणी रिया (बदललेले नाव) ही बी. एस्सी प्रथम वर्षाला तर वैभव हा व्दितीयवर्षाला शिकतो. एकाच गावी राहत असल्याने एकमेकांची ओळख होती. काही दिवसांपूर्वीच ती नागपुरात नातेवाइकांकडे राहायला आली. तिला वैभवची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. दोघांची चॅटिंग सुरू झाली. एकमेकांचे मोबाईलवर बोलणे सुरू झाले. व्हॉट्स अ‍ॅप चॅटिंग अन् फेसबुकवर त्याचे प्रेम फुलले.

त्यांच्या मैत्रीला केवळ तीन वर्ष झाले. त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढल्याने त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला. दरम्यान तिने तिच्या मैत्रिणीची ओळख त्याच्याशी करून दिली. ओळख होताच तो रियाकडे दुर्लक्ष करायला लागला. तिच्या मैत्रिणीशी मोबाईलवर बोलायला लागला. हा प्रकार रियाला माहिती झाला. तिने वैभवची चांगली खरडपट्टी काढली. त्याने रियाच्याही चारित्र्यावर संशय घेत दुसरीकडे प्रेमप्रकरण सुरू असल्याचा आळ घेतला. त्यामुळे तिला आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी अट घातली.

तिला न्यूड व्हॉट्स अ‍ॅप कॉल करण्यास सांगितले. तिनेही प्रेम सिद्ध करण्यासाठी वैभवला व्हिडिओ कॉल केला. मात्र, त्याच्या मनात काळेबेरं असल्यामुळे त्याने मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग केली. त्यानंतर तो रियाला ब्लॅकमेल करायला लागला. सोशल मीडियावर न्यूड व्हिडिओ टाकण्याची धमकी द्यायला लागला. या प्रकारामुळे रियाने जरीपटका पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT