Chandrasekhar Bavankules agitation against Home Minister Anil Deshmukh Nagpur political news 
नागपूर

भाजप आक्रमक : गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमजित सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्राद्वारे केलेल्या आरोपामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपुरातील संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध करीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यांनतर भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर येऊन घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे असा लेटरबॉंब परमबिरसिंह यांनी फोडला आहे. पोलिस दलाचे खच्चिकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. खुद्द गृहमंत्र्यांवर येवढे गंभीर आरोप झाले असताना त्यांना आता गृहमंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

ज्या आत्मविश्‍वासाने त्यांनी पत्रात गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत, तो महत्त्वाचा आणि मोठा पुरावा आहे. पोलिस दलाचे खच्चीकरण करणाऱ्या या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत झाला पाहीजे. इतिहासातील ही पहिली अशी घटना आहे की परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं आणि त्यात ते म्हणत आहेत की, आपल्याला (मुख्यमंत्र्यांना) मी ही बाब सांगितली होती. मग त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय केले? की त्यांनीही या प्रकाराला मुकसंमती दिली, हा प्रश्‍न येथे उपस्थित होतो आहे.

गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी सांगत असत.

या आरोपामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वीकडून गृहमंत्री अनिल देशमुश यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या मुद्द्याला घरून भाजपही चांगलीच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी गृहमंत्र्यांविरोधा आंदोलन करण्यात येत आहे. गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपुरातील संविधान चौकात आंदोलन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT