esakal | आता १ नव्हे तर ४ वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने; सोमवारपासून होणार पुढील बदल
sakal

बोलून बातमी शोधा

All shops allowed until four oclock Nagpur lockdown news

शहरात वाढत असलेली रुग्ण संख्या बघता १५ ते २१ मार्चपर्यंत असणारे कडक निर्बंध आता ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आले. मात्र, यात शिथिलताही आणण्यात आली. गेल्या आठवडाभराचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक विभागीय कार्यालयात घेतली.

आता १ नव्हे तर ४ वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने; सोमवारपासून होणार पुढील बदल

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : कोरोनामुळे प्रशासनाने निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढविले आहेत. मात्र, असे करताना नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सोमवारपासून सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे दुकानदार, हॉटेल व्यवसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. हॉटेल, रेस्टॉरेंटला सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्‍याची परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाइन विक्रीसाठी किचन रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे.

शहरात वाढत असलेली रुग्ण संख्या बघता १५ ते २१ मार्चपर्यंत असणारे कडक निर्बंध आता ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आले. मात्र, यात शिथिलताही आणण्यात आली. गेल्या आठवडाभराचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक विभागीय कार्यालयात घेतली.

जाणून घ्या - अख्खं गाव हळहळलं! पती-पत्नी पाठोपाठ मुलीचाही मृत्यू, एकाचवेळी निघाली तिघांची अंत्ययात्रा

या बैठकीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह आमदार, अधिकारी उपस्थित होते.

हे सुरू 

 • सर्व दुकाने चार वाजेपर्यंत 
 • हॉटेल, रेस्टारेंट सायंकाळी सात वाजेपर्यंत 
 • दूध डेअरी सायंकाळी सात वाजेपर्यंत, होम डिलिवरी रात्री ११ वाजेपर्यंत 
 • हॉटेल, लॉज ५० टक्के क्षमतेने सुरू 
 • कॉटन मार्केट, संत्रा मार्केट दिवसभर (४ वाजेपर्यंतचे बंधन नाही) 
 • दुचाकीवर दोघांना, ऑटो, कारमध्ये तिघांना प्रवासाची मुभा 
 • खासगी आस्थापना, कार्यालये २५ टक्के क्षमतेने सुरू 
 • अत्यावश्यक सेवेतील वगळून सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के क्षमतेसह सुरू 

हे बंदच 

 • शाळा, महाविद्यालय, ट्युशन क्लासेस (ऑनलाइन सेवा मात्र सुरू) 
 • धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, सभागृह, लॉन 
 • सर्व आठवडी बाजार 
 • जलतरण, जिम 
 • क्रीडा स्पर्धा 
 • मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह 
 • पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी 

होळी, धुलीवंदनासाठी वेगळे निर्देश

पुढील आठवड्यात २८ मार्चला होळी तर २९ मार्चला धुलीवंदन आहे. या सणासाठी आवश्यकतेनुसार वेगळे आदेश काढण्यात येईल, असे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेशात नमुद केले आहे. शिथिलतेसह कडक निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असा इशाराही त्यांनी दिला. 

अधिक वाचा - भावी वकिलाने केला बलात्कार अन् आई-वडील म्हणाले, ‘पैसे घ्या आणि मोकळे व्हा’

सर्वांनी सहकार्य करा
पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या पाठीशी यंत्रणा व सर्व पक्षाचे नेते उभे आहेत. बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. 
- नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री

जनतेने स्वयंशिस्त पाळावी
३१ मार्चपर्यंतच्या कडक निर्बंधात जीवनावश्यक वस्तू सुलभतेने उपलब्ध करून दिल्या जातील, असे नियोजन केले आहे. जनतेने स्वयंशिस्त पाळावी. 
- डॉ. नितीन राऊत, पालकमंत्री

टोकाची भूमिका घेणार नाही
लॉकडाऊन हा पर्याय नाही. परंतु, प्रशासनाला वाटत असेल तर लॉकडाऊन करावे, यात आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही. 
- देवेंद्र फडणवीस,
विरोधी पक्षनेते, विधानसभा

go to top