yashomati thakur esakal
नागपूर

Congress Foundation Day: "काँग्रेस पक्ष विदर्भातून नवीन सुरुवात करतोय"; बदल घडण्याचा यशोमती ठाकूरांना विश्वास

इंग्रजांनी केलं ते आज सत्तेतील लोक करत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : काँग्रेस पक्ष विदर्भातून नवीन सुरुवात करत आहे, असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित महारॅलीत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार राहुल गांधींसह देशभरातील दिग्गज काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली. (Congress Foundation Day Congress Party makes fresh start from Vidarbha says Yashomati Thakur)

विदर्भाची भूमी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ताजुद्दीन बाबा, गाडगे बाबा, यांची भूमी आहे. जेव्हा जेव्हा विदर्भातून आवाज दिला त्यावेळी मानवतेचा संदेश देण्याचं काम झालं आहे. सन 1920मध्ये महात्मा गांधी यांनी असा आवाज दिला होता. आज राहुल गांधी आणि मालिकार्जुन खर्गे यांनी आवाज दिला आहे. या आवाजाला सर्वांनी साथ द्यायची आहे, असं आवाहन यावेळी यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, आज भगतसिंग यांची भूमिका घ्यायची आहे. सुनील केदार यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. त्यांना भाजपसोबत येण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती, पण ते ठाम आहेत. इंग्रजांनी केलं ते आज सत्तेतील लोक करत आहेत. विचारधारा एकरूप ठेवत मानवतेचा संदेश देण्यासाठी संविधान मानणारं राज्य आपल्याला आणायचं आहे. पूर्ण ताकद लावणार का? या देशाला एकत्र ठेवणार का? असा जयघोष केला. (Marathi Tajya Batmya)

देश वाचवण्याचा संविधान वाचवण्यासाठी एकोप्यासाठी लढायचं आहे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. यापूर्वी आपण विदेशी लोकांशी लढलो आज चोरांशी लढायचं आहे. एका बाजूला समाजाला तोडण्याचं काम सुरु आहे तर दुसरीकडं आमचे नेते भारत जोडण्याचं काम करत आहेत, असंही यावेळी यशोमती ठाकुरांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT