Indira Gandhi Nagpur: कॉंग्रेस संपली नाही.. ! त्या दिवशी नागपूरने दिला आत्मविश्वास अन् इंदिरा गांधींनी पलटली बाजी..

वर्धापन दिनानिमित्त विदर्भातील नागपुरातून आज काँग्रेसचं लोकसभेच्या प्रचाराचं बिगुल वाजणार आहे.
indira gandhi nagpur
indira gandhi nagpuresakal

नवी दिल्ली : वर्धापन दिनानिमित्त विदर्भातील नागपुरातून काँग्रेसचं लोकसभेच्या प्रचाराचं बिगुल वाजणार आहे. 'है तय्यार हम' रॅलीचं काँग्रेसनं आयोजन केलं आहे. पण याचा काँग्रेसला खरंच किती फायदा होईल? याचे आडाखे बांधले जात आहेत. पण अशाच विदर्भातील एका सभेमुळं इंदिरा गांधींना मात्र मोठ यश मिळालं होतं, याची आठवण यानिमित्त ताजी झाली आहे. (Congress Nagpur Rally confidence given to Indira Gandhi got again Prime Ministrer post)

indira gandhi nagpur
Maratha Mumbai Morcha: मुंबईतल्या मोर्चासाठी कुठल्या मार्गानं यावं? सोबत काय घ्याव?; जरांगेंनी दिल्या स्पष्ट सूचना

काय होती ही घटना?

स्वातंत्र्यापासून सातत्यानं सत्तेत राहणाऱ्या काँग्रेसला १९७७-७८ च्या दरम्यान पहिल्यांदा सत्तेपासून दूर व्हावं लागलं होतं. याचं कारण होतं, १९७५-७७ दरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लागू केलेली आणिबाणी! या २१ महिन्यांच्या आणीबाणीच्या काळात देशभरात अनेक निर्बंध लागू करण्यात आल्यानं इंदिरा गांधींविरोधात मोठी लाट होती. (Latest Marathi News)

याचा फटका त्यांना बसला अन् पुढच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा दारुन पराभव झाला. यानंतर पहिल्यांदाच जनता पार्टीचं बिगर काँग्रेसी सरकार सत्तेत आलं. मोरारजी देसाई नवे पंतप्रधान बनले होते. इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते. त्यामुळं आता इंदिरापर्व संपल्यात जमा झालं होतं.

indira gandhi nagpur
Priyanka Gandhi: प्रियांका गांधींच्या अडचणी वाढणार! आर्थिक घोटाळ्याच्या चार्जशीटमध्ये ईडीनं दाखल केलं नाव

आचार्य विनोबा भावेंच्या आश्रमाला दिली भेट

सततची टीका, करिश्मा संपल्यामुळं कोणालाही त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यात स्वारस्य राहिलं नव्हतं. त्यामुळं आता आपण निवृत्ती घ्यावी, असंही त्यांनी काहीवेळा वाटलं होतं. पण इतक्यात खचणाऱ्या इंदिरा गांधी नव्हत्या. त्यांनी सहज म्हणून आचार्य विनोबा भावे यांच्या वर्ध्यातील पवनार आश्रमाला भेट देऊन त्यांचा सल्ला घ्यायचं ठरवलं. त्यानुसार, त्या नागपूरला विमाननं दाखल झाल्या. (Marathi Tajya Batmya)

indira gandhi nagpur
Sharad Pawar: शरद पवारांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण नाही! राजकारण सुरु असल्याचा मुद्दा ऐरणीवर

करिश्मा संपला

पण आश्चर्य म्हणजे इंदिरा गांधी पंतप्रधान नसल्यानं आणि त्यांची करिश्मा संपल्यानं त्यांच्यासोबत विमानतळावर मोजक्या कार्यकर्त्यांखेरीज कोणीही असण्याचं कारण नव्हतं. त्यामुळं जेव्हा त्या विमानतळावर दाखल झाल्यातेव्हा त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना! कारण त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील झाली. यावेळी कार्यकर्त्यांना आवरनं पोलिसांनाही अवघड बनलं होतं, त्यांना अक्षरशः लाठीचार्ज करावा लागला.

indira gandhi nagpur
Hasan Mushrif: 'मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही', असं कोल्हे खासगीत म्हणाले होते, हसन मुश्रीफांचा खुलासा

यवतमाळच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी

कार्यकर्त्यांच्या या उत्साहामुळं इंदिरा गांधींमध्ये मात्र वेगळाच आत्मविश्वास संचारला. यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये फूट झालेली असतानाही सामान्य कार्यकर्ते मात्र इंदिराजींच्या पाठीशी ठाम होते. राज्यातल्या जनतेचा हा विश्वास त्यांना मोठा दिलासा देऊन गेला. त्यामुळं महाराष्ट्रातून पक्षाची बांधणी करायचं त्यांनी निश्चित केलं.

त्यानुसार त्यांनी यवतमाळमध्ये सभेची घोषणा केली आणि विमानतळावरील सुखद धक्क्यापेक्षा त्या यवतमाळमधील रेकॉर्डब्रेक गर्दी पाहून आवाक् झाल्या. विशेष म्हणजे काँग्रेसच्या फुटीनंतर वसंतराव नाईक इंदिरा काँग्रेसमध्ये नव्हते तरीही त्यांच्या मतदारसंघात इंदिरांसाटी झालेल्या गर्दीनं ते विस्मयकारक झाले होते.

indira gandhi nagpur
Parenting Tips : लहान मुलांसोबत फ्लाईटने प्रवास करताना पालकांनी ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी

तुफान भाषण अन् बाजी पलटली

त्यानंतर प्रत्यक्ष सभेत इंदिराजींनी तुफान भाषण केलं. त्या म्हणाल्या होत्या की, "आणीबाणीत जे काही झालं त्याची जबाबदारी मी घेते. पण इतरांनी देखील काही चुका केल्या पण ते मान्य करायला तयार नाहीत.

पण त्याची देखील जबाबदारी मीच घेते" आणीबाणी आपण का लागू केली याचं स्पष्टीकरण देताना देशात राजकीय व्यवस्थेत गोंधळ निर्माण झाला होता अन् बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण आणीबाणीचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

तसेच आपण लोकशाहीविरोधात नाही त्यामुळेच आणीबाणी मागे घेऊन निवडणुका देखील घेतल्याचं त्यांनी सांगितलं. इंदिरा गांधींच्या या भाषणामुळं जनतेला त्यांचं एक वेगळचं रुप पहायला मिळालं.

indira gandhi nagpur
Corona Update India: देशात कोरानाचा आलेख वाढताच... गेल्या 24 तासात सक्रिय रुग्ण अन् मृत्यूमध्ये देखील वाढ

आरोप-प्रत्यारोपांचा फुगा फुटला

इंदिरा गांधींचं हे स्पष्टीकरण म्हणजे विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा फुगाच त्यांनी फोडला. यामुळं जनतेला मात्र इंदिरा गांधींशिवाय देशाला पर्याय नाही, असं मत तयार झालं. तर दुसरीकडं इंदिराजींना हारवून सत्तेत आलेल्या जनता पक्षाचं सरकार अनेक पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन आलेलं सरकार असल्यानं यामध्ये परस्परांमध्ये मतभेद होऊन हा जनता पक्षच फुटला आणि मोरारजी देसाईंना पंतप्रधानपदावरुन पाय उतार व्हावं लागलं.

indira gandhi nagpur
Parenting Tips : लहान मुलांसोबत फ्लाईटने प्रवास करताना पालकांनी ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी

जनमानसात पुन्हा छबी

आता समोर तिसरा कुठलाच पर्याय नसल्यानं तसेच चुका मान्य करुन जनतेसमोर माफी मागितल्यामुळं इंदिरा गांधींनी जनमानसात पुन्हा आपली छबी निर्माण केली त्यामुळं जनता पक्षाचं सरकार कोसळल्यानंतर पुन्हा एकदा इंदिरा गांधींचा दणदणीत विजय झाला आणि त्या पुन्हा पंतप्रधान बनल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com