yavtmal sakal
नागपूर

Crime News : शिवीगाळ करून सरपंच महिलेचा विनयभंग ; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

गावकऱ्यांची समस्या दूर करण्यासाठी वीज वितरणचे लाईनमन व चार कर्मचारी घटनेच्या दिवशी गावात आले.

सकाळ वृत्तसेवा

महागाव - गावातील वीज समस्या दूर करण्यासाठी रस्त्यावर पडून असलेला सिमेंट खांब आणावयास गेलेल्या सरपंच महिलेस दोघांनी अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केला. ही घटना तालुक्यातील धनोडा येथे शुक्रवारी (ता.३०) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.

या प्रकरणी संशयित विवेक मोरे (वय ३४) आणि विनोद मोरे (वय ४२) यांच्या विरोधात महागाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धनोडा येथे मागील चार दिवसांपासून विजेची समस्या भेडसावत आहे.

गावकऱ्यांची समस्या दूर करण्यासाठी वीज वितरणचे लाईनमन व चार कर्मचारी घटनेच्या दिवशी गावात आले. ट्रान्सफार्मरचा खांब बदलून काही तांत्रिक दुरूस्त्या कराव्या लागतील, असे लाईनमनने सांगितले. गावातील अंबादास गुलफुलवार यांच्या घरासमोर विजेचा सिमेंट खांब पडून होता. तो खांब आणण्यासाठी सरपंच काही गावकऱ्यांना घेऊन तेथे गेल्या. विद्युत खांब नेत असताना धनोडा येथील विवेक मोरे आणि विनोद मोरे या दोघा भावांनी विद्युत खांब नेण्यास मज्जाव केला.

सरपंच महिलेशी हुज्जत घालून या दोघांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे. गावकऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. सरपंच महिलेने या घटनेची तक्रार दिल्यानंतर महागाव पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

Crime News: पहिल्या पतीचं निधन, दुसऱ्यानं सोडलं; नंतर पत्नीनं तिसऱ्या नवऱ्याला जिवंत जाळून संपवलं, धक्कादायक कारण समोर

Vaibhav Sooryavanshi : वैभवने विश्वविक्रमानंतर 'A' अक्षर का दाखवले? जाणून घ्या सेलिब्रेशनमागची हृदयस्पर्शी गोष्ट

Pune Crime: पुण्यात पोलीस चौकीसमोरच तरुणावर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटनेने शहरात खळबळ; नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT