नागपूर

Cyber Crime: ऑनलाईन शेअर मार्केट शिकवण्याचे सांगून ३४ वर्षीय महिलेला घालण्यात आला २४ लाखांना गंडा, वाचा सविस्तर

जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ३४ वर्षीय महिलेला शेअर्सच्या खरेदी-विक्रीमध्ये अधिक नफा देण्याचे अमिष दाखवत २४ लाखांनी गंडवले.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Cyber Crime: जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ३४ वर्षीय महिलेला शेअर्सच्या खरेदी-विक्रीमध्ये अधिक नफा देण्याचे अमिष दाखवत २४ लाखांनी गंडवले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबरला जरीपटका हद्दीत राहणाऱ्या महिला घरी असताना, त्यांच्या मोबाइलवर आलेल्या जाहिरातीवर ‘लिंक मोर’ हे ऑप्शन क्लिक केले. त्यानंतर या महिलेला जेसिका नावाच्या महिलेने ‘आयआयएफएल सर्व्हीस ग्रुप ११७’ नावाच्या एका ग्रुपमध्ये ॲड केले.

या ग्रुपमध्ये असलेल्या इतर दोघांनी त्यांना शेअर बाजारात ट्रेडिंग आणि लर्निंगसाठी जाहिरात दाखवित, त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर त्यांना ‘बी६६ ब्लॅकरॉक स्टॉक्स पुल अप’मध्ये सहभागी करून घेत, त्यांना खरेदी विक्रीमधून अधिक लाभ देण्याचे आमिष दाखविले. यानंतर त्यांना बनावट लिंक पाठवून त्या माध्यमातून २४ लाख ४८ हजाराची विविध शेअर्सच्या नावे गुंतवणूक करून घेतली. (Latest Marathi News)

मात्र, त्यांना अधिकचा लाभांश मिळत नसल्याने त्यांनी विचारणा केली असता, त्यांनी बोलणे बंद करीत गुंतवणूक केलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे याबाबत त्यांनी सायबर सेलला तक्रार दिल्यावर पोलिसांनी आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT