cyber 
नागपूर

आता बोला...चक्‍क पोलिस कर्मचा-यालाच सायबर गुन्हेगाराने बनविले मामा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चोरट्यांपासून सर्वसामान्यांचे रक्षण करणा-या पोलिसालाच मामा बनविल्याची घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सायबर गुन्हेगाराने चक्‍क पोलिस कर्मचाऱ्यालाच हजारोंचा गंडा घातला. पोलिस कर्मचाऱ्यांच्या क्रेडीट कार्डवर चोरट्याने ऑनलाईन 50 हजार रुपयांची खरेदी करून फसवणूक केली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुरेंद्र निमिचंद हरीणखेडे (30, रा. पोलीस लाईन टाकळी, गिट्टीखदान) असे फसगत झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र हरीनखेडे हे पोलिस विभागात वाहनचालक पदावर नोकरीवर आहेत. त्यांचे बँक खाते ऍक्‍सिस बँकेत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी क्रेडीट कार्ड घेतले होते. त्यांनी क्रेडीट कार्ड घेतल्यापासून त्याचा वापरही केलेला नव्हता. ते कार्ड तसेच घरी होते. गेल्या 7 एप्रिलला त्यांना एका भ्रमणध्वनीवरून फोन आला. त्यावेळी ते आंघोळ करीत होते. त्यांच्या पत्नीने भ्रमणध्वनी उचलला व क्रेडीट कार्ड सुरू करायचे आहे असे सांगून माहिती विचारली. त्यानंतर आलेला ओटीपीही विचारला. पत्नीने नकळतपणे सर्व माहिती दिली. त्यानंतर अज्ञात ऑनलाईन चोरट्याने त्या कार्डवरून 50 हजार रुपयांची ऑनलाईन खरेदी केली. आता बँकेने त्यांना क्रेडीट कार्डचे 50 हजार 400 रुपयांचे बिल पाठवले आहे. हे बिल मिळताच त्यांनी बँकेत चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सर्वसामान्यांना गंडा घालणारे सायबर गुन्हेगार आता चक्‍क पोलिसांनाच "मामा' बनवित असल्यामुळे हा घटनेची सर्वत्र चर्चा आहे.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Judicial Employees Protest: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा लवकरच एल्गार; राज्यातील ३४ हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

Dubai Work Reality : दुबईतील झगमगाटामागे दडलंय भयाण वास्तव! भारतीय तरुणाने अवघ्या २ मिनिटांत दाखवली काळी बाजू, पाहा VIDEO

‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ पाठराखीण मालिकेतील अभिनेत्रींचा मराठमोळ्या लूकमध्ये भन्नाट डान्स, Viral Video

Marathi News Live Updates : पुण्यात पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आता दोन शहराध्यक्ष

Shiv Sena Split: निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा? ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा; ‘शिवसेनेत नव्हे, विधिमंडळात फूट’

SCROLL FOR NEXT