esakal | सुन्न करणारी बातमी, उपासमार असह्य झाल्याने दिव्यांग व्यक्तीची मंदिरात आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Kamptee Suicide

मृतक हा धामणगावचा मूळ रहिवाशी होता तो काही वर्षांपूर्वी तो जेसीबी चालविण्याचे काम करायचा. दरम्यान त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून लचकल्यामुळे त्याला वाहन चालविणे जमत नव्हते. त्यातच घरी पत्नीशी पटत नसल्याने ती मुलांना घेऊन कामठी येथे माहेरी निघून गेली.

सुन्न करणारी बातमी, उपासमार असह्य झाल्याने दिव्यांग व्यक्तीची मंदिरात आत्महत्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कामठी (जि. नागपूर) : कोरोनाच्या संकटकाळात हाताला काम नसल्याने अनेक जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशातच अनेक ठिकाणांहून उपासमारीच्या बातम्या येत आहेत. आता नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून आलेल्या बातमीने मन सुन्न झाले आहे. 

कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कामठी कळमना मार्गावरील मरार टोलीतील भिवसेन मंदिरात एका दिव्यांग व्यक्तीने मंगळवारच्या रात्री लोखंडी दाराला दोरी बांधून गळफास घेतला. रामकृष्ण गंगाराम म्हात्रे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मृतक हा धामणगावचा मूळ रहिवाशी होता तो काही वर्षांपूर्वी तो जेसीबी चालविण्याचे काम करायचा. दरम्यान त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून लचकल्यामुळे त्याला वाहन चालविणे जमत नव्हते. त्यातच घरी पत्नीशी पटत नसल्याने ती मुलांना घेऊन कामठी येथे माहेरी निघून गेली. रामकृष्ण मात्र धामणगावातच राहत होता. मात्र काही वर्षांनी नातेवाईकांनी दोघांचीही समजूत घालून एकत्र राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर येरखेडा स्थित मरारटोली येथे सर्वजण एकत्र राहू लागले. परंतु रामकृष्णला पायाच्या व्याधीमुळे कोणतेही काम करणे जमत नव्हते. दरम्यान काही दिवसांपासून त्याला घरच्यांनी जेवण देणे बंद केले होतो. 

आसपासचे नागरिक त्याला जेवायला देत असत. अश्यातच लॉकडाऊनमुळे लोकांना त्याच्यासाठी दोन वेळच्या जेवणाची ववस्था करणे कठीण झाले होते.  त्यामुळे अपंग रामकृष्णणी उपासमाप सुरू झाली.

"रेड झोन'बाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी घेतली ही भूमिका..

कामठी तालुक्यातील येरखेडा येथील घटना
परिसरातील लोकांच्या मते, रामकृष्ण तीन ते चार दिवसांपासून त्रस्त होता. तो कळमना मार्गावरील कुवारा भिवसन देवस्थान सार्वजनिक मंदिरात रात्री मुक्काम करायचा. त्याला स्वतःच्या पायावर चालता येत नव्हते. दोन्ही गुडधे जळलेल्या अवस्थेत असल्याने तो हाताच्या साहाय्याने जमिनीवर घसरून चालत होता. मंगळवारच्या रात्री तो मंदिरात गेला व रात्रीच मंदिराचा लोखंडी गेटला दोरी बांधून गळफास लावला. सकाळी त्या परिसरात पिण्याच्या पाण्याचे नळ सुरू झाले असता ही घटना ग्रमस्थांच्या लक्षात आली. याची सूचना तातडीने नवीन कामठी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.