daru party on road at Nagpur Gramin 
नागपूर

पारशिवनीत संतापजनक प्रकार! भर चौकात लोकं पितात दारू

रूपेश खंडारे

पारशिवनी (जि. नागपूर) : कोरोना विषाणुमुळे सरकारने चिल्लर देशी दारूच्या दुकानात दारू पिण्यास मनाई केली आहे. यामुळे दारुड्यांना अद्दा, पव्वा, बंपर धेऊनच दारूची तहान भागवावी लागत  आहे. मग दोघे-तिघे मिळून शक्य असेल ती दारू घेऊन पाण्याच्या व चखण्याचा शोधात भटकत असतात. मिळेल तिथे उघड्यावर दारूच्या बाटलीचे झाकण खोलून खुलेआम मैफिल सजवितात. अशीच मैफिल शिवाजी चौकात सजते...

चौकात पाणी व चखना मिळत असल्याने दारुड्यांया मोर्चा इकळे वळत आहे. उघड्यावर बसून दारू पिताना वादावादी ही ठरलेली. मग दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडून आपला राग व्यक्त करीत शिवीगाळ करणे, जोरजोरात औरडने अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत. यामुळे रस्‍त्यावर काचांचा सडा पडलेला असतो.

सरकारच्या नियमानुसार दारूच्या दुकानातून दारू मिळते खरे पण सीलबंद. यामुळे दारू दुकानात पिता येत नाही. शहरातील अनेक दारुडे है एकत्र येत पाणी मिळावे यासाठी शहरातील लहान मोठ्या टपरीचा आसरा धेऊन तिथेच चखण्याची सोय करतात. दारूडे उधड्यावर दारूच्या शिशीचे झाकण खोलून आपली इच्छा तृप्त करतात. त्यामुळे शहरातील वातावरण भंग पावत आहे.  तसेच शांतता रसातळाला जात आहे.

मान टाकून रस्ता लागतो औलांडावा

दारूच्या दुकानाशिवाय अनेक ठिकाणी चोरून  दारू मिळत असल्याचे दिसून येत आहे. धोगरा मार्गावर असलेल्या दारू दुकानातून सीलबंद बाटली घेऊन दारुडे रस्त्यावरच दारू पिताना दिसून येतात. त्याच मार्गावरून महिला, मुली,  लहान मुलेबाळे जात असताना. या नागरिकांन खाली मान टाकून रस्ता औलांडावा लागतो.

पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

सायंकाळच्या वेळी जनू दारुड्यांया या रस्त्यावर बाजार भरलेला दिसून येतो. तरी पोलिस प्रशासनाने  उधड्यावर दारू पिणाऱ्या दारुड्यांवर कारवाई करावी, तसेच देशी दारूच्या दुकानात दारू पिण्याची सोय केल्यास येथील मद्यपी उधड्यावर दारू पिणार नाही. सामाजिक वातावरण खराब होणार नाही याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत  गरज आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT