नागपूर

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला संचित रजा मंजूर

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (डॅडी) याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चार आठवड्यांची संचित रजा (फरलो) मंजूर केली आहे. गवळीने कुटुंबीयांना भेटण्यासाठी संचित रजा मिळावी म्हणून कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज खारीज करण्यात आला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेत फौजदारी याचिका दाखल केली.

या प्रकरणी न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे व न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मागील सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेत गवळीला चार आठवड्यांची संचित रजा मंजूर केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.

कारागृह प्रशासनाने फरलो नामंजूर केल्यानंतर अरुण गवळीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. संचित रजा मंजूर केल्यास कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यातय येईल, अशी हमी देण्यात आली. तसेच यापूर्वीच्या रजेच्या वेळी कोणताही गुन्हा झाला नाही, असा दावा करण्यात आला. तेव्हा न्यायालयाने संचित रजा मंजूर केली. अरुण गवळी हा यापूर्वी किमान आठ वेळा कारागृहातून बाहेर आला आल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT