यवतमाळातील हेलिकॉप्टर अपघातावर कॅप्टन अमोल यादव म्हणाले...

यवतमाळातील हेलिकॉप्टर अपघातावर कॅप्टन अमोल यादव म्हणाले...

नागपूर : आठवी शिकलेल्या शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना शेख इब्राहिम (वय २४) याने दोन वर्षे कठोर मेहनत घेऊन हेलिकॉप्टर बनविले. परंतु, ट्रायल घेत असताना मागील बाजूचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर येऊन आदळला. यानंतर मुख्य पंखा शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना शेख इब्राहिम याच्या डोक्याला डोक्यात घुसल्याने मृत्यू झाला. चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनी (१५ ऑगस्ट) उद्घाटन करण्याचा मानस असल्याने त्याच्यावर दडपण आलं आणी हा अपघात घडला, अशी प्रतिक्रिया कॅप्टन अमोल यादव यांनी हेलिकॉप्टर अपघातावर दिली.

फुलसावंगी येथील शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना शेख इब्राहिम याने हे हेलिकॉप्टर तयार केले होते. दोन वर्षांपासून तो यासाठी परिश्रम घेत होता. इस्माईल हा वेल्डिंग कारागीर होता. यामुळे तो आलमारी, कुलर अशी विविध उपकरणे बनवायचा. हे काम करीत असताना चक्क हेलिकॉप्टर बनविण्याची कल्पना त्याच्या मनात आली आणि कामाला लागला.

यवतमाळातील हेलिकॉप्टर अपघातावर कॅप्टन अमोल यादव म्हणाले...
नशिब बलवत्तर; तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊनही रुग्ण बचावला

हळूहळू त्याने हेलिकॉप्टरसाठी लागणारे एक एक भाग तयार केले. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर मंगळवारी रात्री त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टरचा ट्रायल घेतला. परंतु, अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला व तो मुख्य फॅनला येऊन धडकला आणि इस्माईलच्या डोक्याला लागला. पाहता पाहता इस्मालचा जागीच मृत्यू झाला. तरुण मुलं प्रयोग करतात रिस्क घेतात. इस्माईलनेही ते रिक्स घेतले. १५ ऑगस्टला त्याच उद्घाटन करण्याचा मानस असावा. म्हणून त्याच्यावर दडपण आलं असावं. यातच हा अपघात घडला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी प्रतिक्रिया कॅप्टन अमोल यादव यांनी दिली.

इस्माईलने तयार केलेल्या हेलिकॉप्टरची चाचणी करताना अपघात झाल्याचे समजले. टेल रोटर ब्लेड निघून मेन रोटरला आपटले आणि हा अपघात झाला. शोल्डर हारन्स आणि साइट बेल्ट लावला असता तर त्याचा मृत्यू झाला नसता.
- अमोल यादव, कॅप्टन
यवतमाळातील हेलिकॉप्टर अपघातावर कॅप्टन अमोल यादव म्हणाले...
अल्पवयीनचा जबरदस्तीने गर्भपात; खुंटीवर पिशवीमध्ये ठेवले अर्भक

चाचणी सकाळी करायला हवी

इस्माईलने तयार केलेल्या हेलिकॉप्टरचे डिझाइन फार सुंदर आहे. अपघातानंतरही एअर फ्रेम ही आधीसारखी होती. नॉर्मली चाचणी सकाळी करायला हवी. कारण, हवा जास्त नसते आणि पुरेसा उजेड असतो. मागच्या वर्षी १५ ऑगस्टला आम्ही चाचणी केली होती. आम्ही खूप काळजी घेतली होती, असे कॅप्टन अमोल यादव म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com