Dr. bhau Lokhande passed away 
नागपूर

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन

नीलेश डाखोरे

नागपूर : आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. भाऊ लोखंडे यांचे मंगळवारी (ता. २२) निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

डॉ. भाऊ लोखंडे यांचा जन्म १५ जून १९४२ रोजी झाला होता. ते मराठी सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत होते. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील पदव्युत्तर पाली प्राकृत विभागाचे माजी रीडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते.

त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केले आहे. ते ‘विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलना’चे अध्यक्ष होते. त्यांनी ‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ या विषयावर पीएच.डी.साठीचा शोधप्रबंध लिहिला आहे. तसेच ‘रशियातील बौद्धधर्म’ हे पुस्तक लिहिले आहे. गडचिरोलीच्या महात्मा फुले, आंबेडकर विचारमंचाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. भाऊ लोखंडे होते.

थायलंडमधील इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ एनगेज्ड बुड-दिस्टच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य होते. थाई-भूमीमध्ये बौद्ध धर्मावरील चर्चेत जागतिक संमेलनात भाग घेतला होता. नेपाळमध्ये वर्ल्ड फेलोशिप बौद्ध कॉन्फरन्स बौद्ध धम्मावरील प्रबंध सादर केला होता. जपानला भेट दिली आणि डॉ. आंबेडकर यांच्यावर मानवाधिकार परिषदेत मानवाधिकार चँपियनवर सादर केलेला पेपर खूप गाजला होता. निकाय या नियतकालिकाचे ते संपादक होते.

भाऊ लोखंडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अयोध्या कुणाची? रामाची? बाबराची? की बुद्धाची?

  • डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा

  • मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव

  • महाकवी अश्वघोषरचित बुद्धचरित

  • रशियातील बौद्धधर्म

  • सौन्दरनन्द महाकाव्यम्

  • डॉ. आंबेडकरी बावीस प्रतिज्ञा

  • बौद्धांचे सण उत्सव आणि मानसिकता

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना उपदेश, मार्गदर्शन व शिक्षण विषयक विचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra financial Crisis: राज्यावर कर्जाचा बोजा वाढला, प्रत्येक नागरिकावर ८५ हजार २७८ रुपयांचे कर्ज..

शेअर बाजाराला युद्धझळा! कच्चे तेल महागले, गॅसची टंचाई; रुपयाची घसरगुंडी, सोनं झालं स्वस्त

Latest Marathi News Live Update : ‘शांत पश्चिम आशिया हा भारताच्या हिताचा’

Pune Accident: बारामती जळगाव येथील राज्यमार्गावरील भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको!

Shashikant Shinde: कंत्राटदार काय जावई आहे का?, शशिकांत शिंदे; सुरूर-पोलादपूर रस्त्याबाबत आक्रमक, महाबळेश्वर, पाचगणीचे पर्यटन अडचणीत!

SCROLL FOR NEXT