ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन 

टीम ई सकाळ 
Sunday, 20 September 2020

फक्त कोविड १९ हा एकच रोग असा नाही ज्यात शरिरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होते. आणखी एका रोगात ही लक्षणं आढळतात. या लक्षणांनी समजतं की शरिरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे हे समजते. कोणता आहे हा रोग? 

नागपूर : आजपर्यंत आपल्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल किती असेल? याबद्दल आपण कुणीही तितकासा गंभीरपणे विचार केला नसेल. मात्र कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे शरीरातील ऑक्सिजन लेव्हल प्रत्येकानं मोजणं सुरु केलं आहे. इतकंच नाही तर महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन ऑक्सिजन लेव्हल तपासात आहेत. मात्र ही ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे  की जास्त हे ओळखायचं कसं? शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्याबद्दल काही लक्षणं आपल्याला पूर्वसूचना देतात.  कोणती आहेत ती लक्षणं जाणून घेऊया. 

फक्त कोविड १९ हा एकच रोग असा नाही ज्यात शरिरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होते. आणखी एका रोगात ही लक्षणं आढळतात. या लक्षणांनी समजतं की शरिरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे हे समजते. कोणता आहे हा रोग? 

सविस्तर वाचा - खर्राच ठरतोय कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचे कारण; तपासणीत उशीर केल्याने भीतीचे वातावरण 

हायपोक्सिया

जेंव्हा शरिरातील पेशींना, उतींना आणि शरिरांतर्गत अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेंव्हा हा हायपोक्सिया आजार उद्भवू शकतो. शरिरातील रक्तामध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन ती शरिरातील इतर अवयवांना कशी घातक ठरु शकते. खूपदा लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो किंवा रक्ताभिसरण नीट होत नसते. पल्स ऑक्सिमीटर या उपकरणाच्या मदतीने ही क्रिया नीट चालते का समजून घेता येते.

हायपोक्सियाची लक्षणे –

या आजारात श्वास लागतो. श्वास कोंडल्यासारखा होणे हेच हायपोक्सियाचं मुख्य लक्षण मानलं जातं. तो हळूहळू वाढू शकतो.
जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तर रक्तातील आॅक्सिजन लेव्हल कमी होते. आपल्या शरिरातील अवयवांना, पेशींना उतींना प्राणवायू आवश्यक असतो. तो मिळाला नाही तर समस्या निर्माण होऊ शकते. शरिरातील ऑक्सिजन लेव्हल ही ९५% हून अधिक असणं हे उत्तम आरोग्यदायी असण्याचं लक्षण मानलं जातं. पण ९० पेक्षा कमी असलेली  ऑक्सिजन लेव्हल ही थोडीशी घातक असते. ही हळूहळू कमी होत गेली की रुग्ण गंभीर होतो आणि दगावू शकतो. ही कमी झालेली ऑक्सिजन लेव्हल डाॅक्टर बाहेरुन ऑक्सिजन देऊन वाढवू शकतात पण त्यालाही मर्यादा असतात. 

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आहेत तब्बल इतके गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; वाचून तुम्हालाही नक्की वाटेल अभिमान

नैसर्गिकरित्या अशी वाढवा ऑक्सिजन लेव्हल-

  • पोफळी, मनीप्लँट, स्नेक प्लँट, जरबेरा यांची लागवड करुन घरातल्या घरात नैसर्गिक आॅक्सिजन मिळू शकतो.
  • ताणतणावाचं व्यवस्थापन करुन मनानं प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करणं, योगा प्राणायाम, मेडिटेशन यांच्या सहाय्यानं आरोग्य जपणं हे आपण करु शकतो.
  • व्यायाम करणं हा सर्वात उत्तम पर्याय आहे. त्यामुळं शरिरातील पेशीना, आॅक्सिजन लेव्हल व्यवस्थित मिळते. शरीरही निरोगी राहते. योगा करणं, सकारात्मक विचार करणं या सर्व गोष्टी उपयुक्त आहेत.
  • चालण्याचा व्यायाम हा सोपा पर्याय आहे. त्यानं तुमच्या शरिरातील आॅक्सिजन लेव्हल वाढते व प्रतिकारशक्ती पण वाढते.
  • भरपूर पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे शरिरातील कोरडेपणा कमी होऊन आॅक्सिजन लेव्हल वाढायला मदत होते.
  • चौरस आहार घ्यावा. षड्रसयुक्त अन्न हे‌ शरिरासाठी उपयुक्त आहे. ताज्या, उकडलेल्या भाज्या, हिरव्या शेंग वर्गातील भाज्या जसं घेवडा, गवार,बीन्स यांचा मुबलक प्रमाणात वापर करावा.
  • शिजवलेला बटाटा लीनची पाने यात प्रोटीन असतात. त्याचा फायदा होतो. मिठाचा मर्यादित प्रमाणात वापर करा. त्यामुळे उच्च रक्तदाब कमी होऊ शकतो.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these are the symptoms of low oxygen level in your body