Ex deputy mayor Satish Hole may enter in NCP in Nagpur Latest News  
नागपूर

उपराजधानीत देवेंद्र फडणवीसांना बसणार मोठा धक्का; माजी उपमहापौर हाती 'घड्याळ' घालण्याची चिन्हं 

राजेश चरपे

नागपूर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची शहरातील तीन नगरसेवकांनी भेट घेतली. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यात आभा पांडे, सतीश होले आणि मोहम्मद जमाल यांचा समावेश असल्याचे समजते.

जयंत पाटील विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी परिवार संमेलनाच्या माध्यमातून ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या थेट'भेटीगाठी घेत आहे. सोमवार आणि मंगळवारी दोन दिवस त्यांनी शहरातील आणि जिल्ह्याच्या सहा विधान सभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. आगामी महापालिकेच्या निवडणूक आणि राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी पाटील यांनी सर्व नेत्यांना कामाला लावले आहे. तीन नगरसेवक आणि काँग्रेस, भाजपच्या अनेक पदाधिकारी त्यांना भेटल्याने पाटील यांचा दौरा सार्थकी लागला आहे.

आभा पांडे या मूळच्या काँग्रेसच्या आहेत. स्थायी समितीच्या त्या अध्यक्ष होत्या. चार नगरसेवकांच्या प्रभागात त्या एकट्या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. यावरून त्यांची ताकद दिसून येते. अनेक दिवसांपासून त्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र काही स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा प्रवेश रखडला होता. त्यांनी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांविरोधात मध्य नागपूरमधून विधानसभेची निवडणूक लढली होती. सतीश होले यांचीसुद्धा वाटचाल अशीच आहे. काँग्रेस, अपक्ष आणि भाजप असा प्रवास त्यांनी केला. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी महापालिकेची अपक्ष निवडणूक जिंकून आपली ताकद दाखवली. त्यानंतर भाजपत प्रवेश केला. ते उपमहापौरसुद्धा होते. 

विधानसभेत त्यांनी बंडखोरी केली. आमदार मोहन मते आणि काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले होते. त्यामुळे होले यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. उत्तर नागपूरमधील बसपचे नगरसेवकही नाराज आहेत. त्यापैकी काहींनी यापूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख आणि खासदार प्रफुल पटेल यांची भेट घेतली आहे. यावरून त्यांचाही पक्ष प्रवेश जवळपास निश्तिच झाला आहे.

दरम्यान, काही भाजपच्या नेत्यांनी प्रत्यक्ष भेटण्याऐवजी मध्यस्थांच्या माध्यमातून जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा बायोडेटा प्रदेशाध्यक्षांनी व्हॉट्‍ॲपवरून मागवून घेतल्याचे समजते. यात भाजपच्या काही नगरसेवकांचा समावेश असल्याचे कळते.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT