abv 
नागपूर

तीन दिवसांपासून बेपत्ता होता शेतकरी; विहिरीतील पाणी काढताच दिसलं भयंकर दृश्य  

संजय आगरकर

कोंढाळी (जि. नागपूर) :  येथून १३ किलोमीटर अंतरावरील चंदनपार्डी येथील शेतकरी सुरतराम मैफत खवसे (वय५५) यांनी मागील सततच्या नापिकीमुळे शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्यांनी नापिकी व बँकेच्या कर्जापायी आत्महत्या केल्याची तक्रार कोंढाळी पोलिस ठाण्यात दिल्याची माहिती आहे. 

प्राप्त माहितीनुसार सुरतराम खवसे हे काही दिवसांपासून सततच्या नापिकी व बँकेच्या कर्जामुळे कंटाळले होते. त्यांनी ३ फेब्रुवारीला यावर्षीचे शेतात पिकविलेले सोयाबीनचे दोन कट्टे विकण्याकरिता कोंढाळी येथे आणले. तेव्हापासून ते परत घरीच आले नाही. त्यामुळे नातेवाईकानी त्यांचा ४ तारखेपासून परिसरात व जंगलात शोध घेतला. परंतु शोध लागला नाही. म्हणून सुरतराम यांच्या शेतातील विहिरीत शोध घेतला. तिथेही काहीच आढळले नाही. 

मोटरपंप लावून विहिरीतील पाणी खाली केले असता सुरतराम खवसेचा मृतदेह दिसून आला. पोलिस पाटील उमेश खवसे यांनी कोंढाळी पोलिसांना विहिरीत मृतदेह असल्याची माहिती दिली. ठाणेदार विश्वास पुल्लरवार, हेड काँस्टेबल सुनील बन्सोड, गौरव मोकळेंसह पोलिस घटनास्थळी पोहचले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढून त्याची ओळख झाली. 

पंचनामा करून मृतदेह काटोल येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्याकरिता पाठविण्यात आला. त्यांच्या पत्नीने पती सुरतराम यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार दिली. ठाणेदार विश्वास पुल्लरवार हे घटनेचा तपास करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT