Gram Panchayat election Results Anil Deshmukh group wins in Katol Nagpur  
नागपूर

Gram Panchayat Elections Results: काटोलच्या गडावर गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गटाचं वर्चस्व 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर ः काटोल विधानसभा मतदारसंघातील काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्याचं कारण म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तालुका. अनिल देशमुखांच्या यांच्या गटाने एकहाती विजय मिळविला. काटोल मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. काटोल तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायती तर नरखेड तालुक्यातील १७ पैकी १६ ग्रामपंचायतीवर अनिल देशमुख गटाने विजय मिळविला आहे.

काटोल तालुक्यातील भोरगड मध्ये ९ पैकी ९ ही उमेदवार, खंडाळा ग्रामपंचायत मध्ये ७ पैकी ७ ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर चेनकापूर-माळेगाव मध्ये ९ पैकी आठ जागांवर राष्ट्रवादी व शेकापचे उमेदवार विजयी झाले आहे. 

नरखेड तालुक्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाने तालुक्यातील सर्वात मोठया असलेल्या जलालखेडा ग्रामपंचायतीमध्ये १३ पैकी १० जागांवर, थडीपवनी येथे ९ पैकी ९ जागांवर, महेंद्री येथे ७ पैकी ६, खैरगाव येथे १३ पैकी १०, सिंजर येथे ७ पैकी ५ , अंबाडा येथे ९ पैकी ७, सायवाडा येथे ९ पैकी ६ राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. मदना येथे राष्ट्रवादी व शिवसेना सोबत मिळून लढली होती. येथे एकहाती या आघाडीने सत्ता मिळवित ९ पैकी ९ ही जागेवर विजय प्राप्त केला आहे.

उमठा येथे ७ पैकी ५, दातेवाडी मध्ये ९ पैकी ४, पेठमुक्तापुर ९ पैकी ६, जामगाव खुर्द ९ पैकी ६ , देवग्राम ९ पैकी ८, माणिकवाडा ९ पैकी ६, येरला ७ पैकी ५, देवळी ७ पैकी ५ आणि खरबडी येथे ७ पैकी ४ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. तसेच नागपूर तालुक्यातील बाजारगाव सर्कलमधील पेठ ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व ९ ही उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झाले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : होर्मुझ तणाव पेटला! भारतीय जहाजावर गोळीबारानंतर मोदी सरकारचा राग उफाळला; इराणी राजदूतांना समन्स

Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

Satara Politics: पाटणच्या पाणीप्रश्नावरून शंभुराज देसाईंचा पाटणकरांना अप्रत्यक्ष टोला; ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावण्याचे निर्देश

SRH vs CSK Live: संजू सॅमसनचा एक निर्णय अन् गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याने हैदराबादचे नशीब बदलून टाकले; चेन्नईने कमबॅक केले

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SCROLL FOR NEXT