esakal | काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली
sakal

बोलून बातमी शोधा

leopard and tiger attack on two women in gadchiroli

तुळशीबाई हलामी (वय ७०) शनिवारी पहाटे साड़ेपाच वाजताच्या सुमारास घरानजीक असलेल्या शेतात शौचास गेली होती. ती वृद्ध असल्याने हातात काठीचा आधार घेऊन जात होती.

काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : धानोरा तालुक्‍यातील काकडयेली गावातील तुळशीबाई हलामी शनिवारी पहाटे साड़ेपाच वाजताच्या सुमारास घरानजीक असलेल्या शेतात शौचास गेली होती. परत येताना तिला कुत्रासदृश्य प्राणी दिसला. त्यामुळे तिने काठी मारली. मात्र, तो प्राणी समोर येताच अंगाचा थरकाप उडाला.

हेही वाचा - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

तुळशीबाई हलामी (वय ७०) शनिवारी पहाटे साड़ेपाच वाजताच्या सुमारास घरानजीक असलेल्या शेतात शौचास गेली होती. ती वृद्ध असल्याने हातात काठीचा आधार घेऊन जात होती. परत येताना थोडा काळोखच असल्याने वाटेत दबा धरून बसलेल्या बिबट्याला तिने चक्‍क कुत्रा समजून काठी मारली. त्यामुळे चिडलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. तिने आरडाओरड करताच घराजवळील लोकांनी धाव घेतल्याने बिबट्या पळून गेला. जखमी महिलेला ग्रामस्थांनी लगेच ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे उपचारासाठी दाखल केले. 

हेही वाचा - स्वदेशी लस नको रे बाबा! कोव्हॅक्सिनऐवजी कोव्हिशिल्ड लसीची मागणी; अनेक डॉक्टरांचा नकार

दुसरी घटना गडचिरोली तालुक्‍यातील कळमटोला येथे घडली आहे. सुनंदा भोयर ही महिला शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जंगलात केरसुणीचे गवत आणण्यासाठी चार महिला व तीन पुरुष सोबत गेली होती. ती गवत तोडत असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला केला. ही महिला गंभीर जखमी असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


 

loading image