The largest goat market of Central India in Nagpur 
नागपूर

या शहरात होणार मध्य भारतातील सर्वात मोठे 'गोट मार्केट'... 

नीलेश डोये

नागपूर : विदर्भ हा खवय्यांचा प्रांत म्हणून ओळखला जातो. विशेषत: प्रसिद्ध सावजी भोजनामुळे येथील मांसाहाराला सर्वाधिक पसंती असते. त्यामुळे गोट मार्केटला येथे विशेष वाव आहे. आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकऱ्यांना कुक्‍कुटपालन, शेळीपालन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शेतीला जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. त्याच दृष्टीने विदर्भातील सर्वात महत्त्वाचे शहर असलेल्या नागपुरात एक मोठे मार्केट उभारण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. जाणून घेऊया याबाबत... 

मध्य भारतातील सर्वांत मोठी धान्य व भाजीपाल्याची बाजारपेठ कळमन्यात आहे. विविध ठिकाणी येथून माल पुरविला जातो. नागपूर व आसपासच्या जिल्ह्यात अनेक "गोट फार्म' तयार होत आहेत. पाश्‍चात्य व आखाती देशात असलेली बकऱ्यांची मागणी भारतातून पूर्ण केली जाते. यामुळे या व्यवसायात येत्या काळात मोठी संधी आहे. नागपूर शहर पूर्वीपासूनच मोठी बकरा मंडी म्हणून ओळखले जात असले तरी येथून निर्यात होत नाही. यामुळे नागपूरच्या बकरा मंडीला ओळख मिळालेली नाही. नागपुरात होणारे हे नवे आंतराष्ट्रीय गोट मार्केट नागपूरच्या व्यापारी व गोट फार्मसाठी त्यांच्या व्यवसायाला पूरक ठरणार आहे. 

पशुसंवर्धनमंत्र्यांचा पुढाकार... 


नागपुरातच मध्य भारतातील सर्वात मोठे गोट मार्केट उभारले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे मार्केट कळमना बाजारच्या शेजारी उभारण्यात येणार आहे. याला सरकारची मंजुरी मिळाली असून, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालय मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकारातून हे मार्केट सुरू होत असल्याचे सांगण्यात येते. कळमना मार्केटच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या गोट मार्केटसाठी बाजार समिती संपूर्ण खर्च करणार आहे. येथे मालाची साठवणूक, व्यापाऱ्यांसाठी जागा, गाड्याची पार्किंगसह सर्व सुविधा अत्याधुनिक असणार आहेत. या मार्केटचा नकाशा तयार झाला असून बांधकामाचे इस्टिमेट करण्याची तयारी सुरू आहे. लवकरच निविदा काढून बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

रोजगारासोबतच व्यवसायपूरक ठरणार 


सहकार महर्षी स्व. बाबासाहेब केदार यांनी स्थापन केलेल्या कळमना मार्केट परिसरात बाजार समिती आंतरराष्ट्रीय गोट मार्केट व्हावे यासाठी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या मंत्रालयाकडून आवश्‍यक असलेल्या सर्व गोष्टींना तत्काळ मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय नाशिक व हैदराबाद येथील व्यापाऱ्यांनी नागपूर विमानतळावरून नुकतीच आखाती देशात विमानाने बकऱ्यांची निर्यात केली आहे. नागपूर येथील आंतरराष्ट्रीय मिहान प्रकल्प हा जागतिक कार्गो पॉइंट असून, त्यास कळमना येथील गोट मार्केट व्यवसायपूरक ठरणार आहे. 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA WORLD CUP 2026: मृत्यूला हरवून 'तो' मैदानावर उतरला; वर्ल्ड कपमध्ये पहिला गोल करताच ढसाढसा रडला... कोण आहे Raúl Jiménez?

आता IRCTC वेबसाईट हँग होणार नाही! १५ जुलैपासून नवी प्रणाली लागू; तत्काळ तिकीट बुकिंगचा त्रास संपणार?

Smart Meter Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात 'स्मार्ट मीटर'ला सर्वाधिक पसंती, पावणेआठ लाख घरामध्ये कनेक्शन बसवले

Latest Marathi News Live Update : गर्भवती असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी

Petrol-Diesel Rate: मोठी बातमी! पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदीवर ९० दिवसांची बंदी; केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, पण कुणासाठी?

SCROLL FOR NEXT