esakal | तिला माहीत होतं आपण मरणार; तरी नियतीला शरण न जाता मिळवले 75 टक्के; मात्र, कौतुक ऐकण्यासाठी ती आज नाही...
sakal

बोलून बातमी शोधा

Twelfth grade student dies of leukemia at Chandrapur

सततच्या उपचारांमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे. तरीही परिस्थितीला शरण न जाता त्यावर मात करत संजीवनीने बारावीच्या निकालात घवघवीत यश मिळविले. अत्यंत वेदना देणारा आजार मात्र कुटुंबाची भरभरून मिळालेली साथ या जोरावर तिने बारावीचे रण जिंकले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने डॉक्‍टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. 

तिला माहीत होतं आपण मरणार; तरी नियतीला शरण न जाता मिळवले 75 टक्के; मात्र, कौतुक ऐकण्यासाठी ती आज नाही...

sakal_logo
By
साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर : साधा तापही आला तर आपण किती नाटक करतो. माझाच्यानी उठन होत नाही. मी हे करणार नाही. ते करणार नाही असं म्हणून प्रत्येक कामापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत असतो. मग अभ्यात तर दूरचीच गोष्ट. नावही काढत नाही आपन. कर्करोगाशी लढा देत असताना बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण हेण्याचा विचार तरी करू का आपन... मात्र संजीवनी उसेरटी याला अपवाद ठरली... तिने दहावीच्या परीक्षेत तब्बल 75 टक्के गुण प्राप्त केले. मात्र, तिच्या नशिबी मृत्यू आला अन्‌ होत्याचे नव्हते झाले... 

चंद्रपूर जिल्ह्यातील तुकूम परिसरात उसेरटी कुटुंब राहतो. त्यांना संजीवनी ही मुलगी. संजीवनी दहाव्या वर्गात असताना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि उसेरटी कुटुंबीय हादरले. मात्र, संजीवनीने हिंमत हारली नाही. उपचार घेतच दहावीत तिने तब्बल 75 टक्के गुण मिळविले. संजीवनीला सातत्याने केमोथेरपीसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागत होते. याशिवाय सतत रक्तदेखील द्यावे लागत होते. उपचारादरम्यान जमेल तसा वेळ अभ्यासासाठी काढला. नियतीला शरण न जाता आलेल्या परिस्थितीशी दोन हात केले. बारावीच्या परीक्षेतही 75 टक्के गुण मिळविले आणि निराशा झालेल्या, उमेद खचलेल्या तरुणाईसमोर नवी प्रेरणा निर्माण केली.

अधिक वाचा - ते तुकाराम मुंढे आहे... डोळ्यांत धूळ फेकणे कठीणच, वाचा संपूर्ण प्रकार

वेदना देणाऱ्या आजारात कुटुंबीयांची भरभरून साथ मिळाली. कुटुंबीय आणि आत्मबळाच्या भरोशावर बारावीत तिने हे यश मिळविले. तिला डॉक्‍टर व्हायचे होते. मात्र, तिचे स्वप्न आता कायमचे मिटले. नागपुरातील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी तिची प्रकृती ढासळली आणि मृत्यू झाला. अन्‌ असह्य वेदनांची अखेर झाली. 

लहान-सहान गोष्टींवरून आजचे तरुण आत्महत्या करण्यासारखा टोकाचा निर्णय घेतात. अल्पशा यशाचे खचून आत्मघाताचा निर्णय घेण्याचे प्रमाण तरुणाईत अधिक आहे. मात्र, संजीवनीने मोठ्या हिमतीने आयुष्यासोबत लढली. परीक्षेच्या काळातही तिला कर्करोगावरील उपचारासाठी केमोथेरपी घ्यावी लागत होती. सतत रक्त बदलावे लागत असल्याने गेले वर्षभर संजीवनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरी ती हिंमत हारली नाही. तिची हिंमत तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. 

सततच्या उपचारांमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे. तरीही परिस्थितीला शरण न जाता त्यावर मात करत संजीवनीने बारावीच्या निकालात घवघवीत यश मिळविले. अत्यंत वेदना देणारा आजार मात्र कुटुंबाची भरभरून मिळालेली साथ या जोरावर तिने बारावीचे रण जिंकले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने डॉक्‍टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली.

अधिक वाचा - 'ती' म्हणाली, आता तू माझी बायको आणि माझ्या नवऱ्याचीही... 

यशाचा आनंद ठरला क्षणिक

संजीवनी चार वर्षांपासून रक्‍ताच्या कर्करोगाशी लढत होती. एकीकडे कर्करोगाशी तिचा दररोजचा संघर्ष, दुसरीकडे बारावीची परीक्षा जवळ येत असल्याने अभ्यासाकडेही तिचा ओढा होता. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संजीवनीला डॉक्‍टर व्हायचे होते. परंतु, नियतीने काही वेगळेच ठरवले होते. बारावीची परीक्षा तर तिने दिले. घवघवीत यशही तिने मिळविले. परंतु, या यशाचा आनंद क्षणिक ठरला. 

सर्वत्र तिचे कौतुक

कर्करोगाशी लढा देत असताना संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयात दाखल झाली. मृत्यूशी दोन हात करत तिने बारावी गाठले. मात्र, ती वर्गात अभावानेच बसली. तिचे पूर्ण शिक्षण एका अर्थाने ऑनलाईन झाले. वेळच तशी होती. एवढ्या मोठ्या आजाराशी लढा देत असताना बारावीत तिने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. परंतु, हे कौतुक ऐकण्यासाठी आज ती नाही. 

संपादन - नीलेश डाखोरे 

loading image
go to top