man beat brother of girl and girlfriend also in Nagpur Crime news  
नागपूर

प्रेमी की वैरी? प्रेमाच्या त्रिकोणातून प्रेयसीवर हल्ला तर प्रेयसीच्या भावाला मारहाण; दोन घटनांनी हादरलं नागपूर

अनिल कांबळे

नागपूर ः प्रेमात वितुष्ट आल्यानंतर संबंध विकोपाला जाऊन विनयभंग, मारहाण, अश्‍लील शिवीगाळ किंवा हल्ला करण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या महिन्यात बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. अशाच दोन घटना हुडकेश्‍वर आणि वाठोड्यात उघडकीस आल्या आहेत. हुडकेश्‍वरात प्रेमाच्या त्रिकोणातून प्रेयसीला बेदम मारहाण केली तर वाठोड्यात प्रेयसीच्या भावाने प्रेमास विरोध केल्यामुळे प्रियकराने मारहाण केल्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्‍वर परिसरात राहणारी २९ वर्षीय पीडित महिला विवाहित असून तिला एक मुलगी आहे. पतीसोबत पटत नसल्यामुळे ती वेगळी राहते. ती सॅनिटरी पॅड विकण्याचा व्यवसाय करते. तिची ओळख एका कार्यक्रमात आरोपी पंकज मनोहर तुमाने (३२, टिमकी, तहसील) याच्याशी झाली. 

पंकज हा कळमना मार्केटमध्ये दलाल आहे. त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. तिच्याशी चॅटिंग केली. पतीपासून वेगळी राहत असल्याचा फायदा पंकजने घेतला. तिच्याशी लाडीगोडी लावत तिला जाळ्यात ओढले. तिच्या घरी येणे-जाणे सुरू केले. त्याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. तिला जाळ्यात ओढल्यानंतर तिला वेगवेगळे आमिष दाखवायला लागला. 

गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, त्याच्या मागण्या वाढत गेल्यामुळे तिने दुरावा केला. दरम्यान तिची ओळख आणखी एका युवकाशी झाली. दोघांची मैत्री झाली. त्यांची मैत्री पंकजला खटकायला लागली. त्याने तिला त्रास देणे सुरू केले. १२ जानेवारीला तिचा पंकजने पाठलाग केला. तिच्याशी अश्‍लील चाळे करीत तिला मारहाण केली. 

वाठोड्यात राहणारी २९ वर्षीय महिला ही आरोपी विशाल लुळाळे (२५, वाठोडा) याच्या हॉटेलमध्ये काम करीत होती. महिलेच्या पतीने तिला सोडले आहे. ती मुलासह माहेरी राहते. हॉटेलमध्ये काम करीत असताना विशालची वाकडी नजर महिलेवर होती. जवळपास एक वर्षे काम केल्यानंतर विशाल तिच्याशी अश्‍लील चाळे करीत होता. हॉटेलमध्ये ग्राहक नसताना तिच्याशी लगट करीत होता. त्याच्या त्रासामुळे तिने तेथील काम सोडले. त्यामुळे चिडलेल्या विशालने तिचा पाठलाग करणे सुरू केले. तिला फोन करून अश्‍लील संवाद साधणे सुरू केले. तिने भावाकडे तक्रार केली. भावाने विशालची भेट घेऊन समजूत घातली. त्याने त्याला मारहाण केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT