man killed in road accident at Nagpur 
नागपूर

भरधाव वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार

नितीन कुरई

बुटीबोरी (जि. नागपूर) : धाब्यावर काम मागायला आलेल्या इसमाला काम न मिळाल्याने रस्ता ओलांडून परत जात होता. त्याच मार्गावरून भरधाव जाणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने इसम जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बुटीबोरी पोलिस हदीत घडली. राजेश गणेशप्रसाद तिवारी (वय ५०, रा. नरखेड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, राजेश हे राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वरील जंगेश्वर नजीकच्या अमृत धाब्यावर काही दिवसांपूर्वी कामाला होते. लॉकडाउन काळात सर्व व्यवसाय बंद झाल्यामुळे ते काम सोडून गेले होते. स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर गावाकडे काम नसल्याने आणि त्याची या धाब्यावर जुनी ओळख असल्यामुळे त्याला परत काम मिळेल, या आशेने येऊन त्याने कामासाठी विचारपूस केली. परंतु, सध्या काही काम नाही, काम वाढल्यास आम्ही तुम्हाला परत बोलावू, असे सांगून धाबा मालकाने त्याला तूर्तास मनाई केली. त्यामुळे ते परत निघाले.

रस्ता ओलांडत असताना हैदराबाद नागपूर मार्गाने भरधाव येत असलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी ठाण्याचे एपीआय माणिक चौधरी, वाहतूक विभागाचे मयूर ढेकले, रवी बावणे, अभिषेक भैसे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देऊन मृतदेह ताब्यात घेतला.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT