esakal | पुन्हा पाऊस येणार, सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Rain coming again, warning alert; Staff stay at headquarters

परतीच्या पावसाला सुरूवात झाल्यामुळे जिल्ह्यात शुक्रवार (ता. १६) पर्यंतच्या कालावधीत हल्का ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह होण्याची शक्यता हवामान विभाग नागपूरने व्यक्त केली आहे.

पुन्हा पाऊस येणार, सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : परतीच्या पावसाला सुरूवात झाल्यामुळे जिल्ह्यात शुक्रवार (ता. १६) पर्यंतच्या कालावधीत हल्का ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह होण्याची शक्यता हवामान विभाग नागपूरने व्यक्त केली आहे.

जिल्ह्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकार जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.


यावर्षीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व इतर लघु प्रकल्पांमध्ये जवळपास १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

इतरही प्रकल्पांमधील जलसाठ्यामध्ये सतत वाढ होत आहे. प्रकल्प क्षेत्रामध्ये पर्जन्यमान होवून प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ झाल्यास विसर्ग वाढविणे किवा कमी करण्याबाबत निर्णया घेण्यात येईल.

तरी याबाबत नदीपात्रा शेजारील गावातील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

त्यासह संबधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक कृषी सहाय्यक, आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच नागरिकांनी नदी नाल्यांना पूर असताना पूर ओलाडण्याचा प्रयत्न करु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

loading image
go to top