Married woman suicide Married woman suicide
नागपूर

‘तो माझ्यावर शंका घेतो, मला माहेरी सोडा’ असे म्हणत आत्महत्या

मंगेश गोमासे

नागपूर : ‘तो माझ्यावर सतत शंका घेतो, माझे कुणाशीही काहीच सुरू नाही, मला माहेरी सोडा’ असे म्हणत २५ वर्षीय विवाहितेने गळफास (Married woman suicide) घेत आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गजानननगर परिसरात घडली. ज्योत्सना रंजीत धुर्वे असे मृत विवाहितेचे नाव आहे. (Married woman suicide)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी धुर्वे दाम्पत्य कामाच्या शोधात मध्यप्रदेशातून हिंगण्यातील गजानननगर येथे वास्तव्यास आले. रंजीत परिसरातील कंपनीत कामाला लागला. तो दररोज ज्योत्सनावर शंका (Doubt over character) घेऊन भांडण करायचा. त्यामुळे ती सतत ‘तो माझ्यावर शंका घेतो, मला माहेरी सोडून द्या. मला जायचे आहे’ असे म्हणायची.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास त्याने दारू आणली. दारू पती-पत्नी प्यायले. त्यानंतर दोघांचीही शाब्दिक चकमक उडाली. यावेळीही रंजीतने ज्योत्सनावर शंका (Doubt over character) घेतल्याने ती आणखीच चिडली. तसेच तिने पुन्हा मला माहेरी सोडून द्या असे म्हटले. त्यामुळे रंजीत बाहेर निघून गेला. दहा मिनिटांत तो परत आला असताना त्याला ज्योत्सनाने दुप्पटाच्या सहायाने गळफास लावलेल्या अवस्थेत (Married woman suicide) दिसली.

रंजीतने तिला खाली उतरविले. तेव्हा तिच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याने पाणी पाजले. त्यानंतर लगेच तिने प्राण सोडले. रंजीतने याची माहिती एमआयडीसी पोलिसांना (Police) दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. तसेच प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT