Murder of brother in Nagpur crime news 
नागपूर

दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या भावाची काठीने वार करून हत्या

अनिल कांबळे

नागपूर : दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या भावाची काठीने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना काटोलपासून १० किमी अंतरावरील इसापूर खुर्द येथे घडली. रोशन नागोराव ठाकरे (वय २५) असे मृताचे नाव आहे. काटोल पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून नितेश नागोराव ठाकरे (वय २३) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजताच्या सुमारास नितेश हा जेवण करीत होता. रोशन हा दारू पिऊन आला. त्याने नितेश याला शिवीगाळ केली. संतप्त नितेश याने काठीने त्याला मारहाण केली. यात रोशन याचा मृत्यू झाला. काटोल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान नितेश याने मारहाण केल्याने रोशनचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून नितेश याला अटक केली.

युवकावर हल्ला

क्षुल्लक कारणावरून दोघांनी विकास सोनवाणे (वय २४) याच्यावर काठीने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी दुपारी जाटतरोडी भागात घडली. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी ऋतिक शंकर राठोड वय २० व अल्पवयीन साथदाराविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

मच्छिंद्र कांबळी यांचं अजरामर 'वस्त्रहरण' नाटक पुन्हा भेटीला येणार; 'हा' कसलेला अभिनेता साकारणार तात्या सरपंच

Latest Marathi News Live Update : चाकण परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या बेकायदेशीर विक्रीचा भंडाफोड; २५१ सिलेंडर जप्त

SCROLL FOR NEXT