esakal | कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला
sakal

बोलून बातमी शोधा

girl died in car accident at law college square in nagpur

मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ते चौघेही कारने परत येत होते. लॉ कॉलेज चौकातून जात असताना आरोपी कारचालक प्रेम चंदनानी याचे कारवरील नियंत्रण सुटले.

कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : भरधाव कार दुभाजकावर धडकल्याने झालेल्या अपघातात तरुणी ठार झाली तर चालकासह तिघे गंभीर जखमी झाले. तिघांवरही न्यूरॉन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री लॉ कॉलेज चौकात झाला. बरखा हरिष खुराणा (२४) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या आणखी १३ शाळा होणार बंद, विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्की हरिष खुराणा (२२) व त्याची बहिण बरखा तसेच नातेवाईक रिया जगन्नाथ खुराणा (२३) व प्रेम अशोक चंदनानी (२०) हे शुक्रवारी सायंकाळी अमरावती रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेले होते. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ते चौघेही कारने परत येत होते. लॉ कॉलेज चौकातून जात असताना आरोपी कारचालक प्रेम चंदनानी याचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कार दुभाजकावर आदळली. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिस नियंत्रण कक्षाने अंबाझरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी जखमींना खासगी रूग्णालयात हलविले. उपचारापूर्वीच बरखाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी कारचालक प्रेम चंदनानी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

go to top