Nagpur Crime  Esakal
नागपूर

Nagpur Crime: अत्याचारानंतर युवतीच्या वडिलांना पाठवला व्हिडीओ, बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांला पळून जाण्याआधीच अटक

अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अश्‍लील व्हिडीओ वडिलांना पाठवून व्हायरल करणाऱ्या बी.कॉम.च्या विद्यार्थ्याला शांतीनगर पोलिसांनी अटक केली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Minor Girl Blackmailed: अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अश्‍लील व्हिडीओ वडिलांना पाठवून व्हायरल करणाऱ्या बी.कॉम.च्या विद्यार्थ्याला शांतीनगर पोलिसांनी अटक केली. ही धक्कादायक घटना ४ मार्चला दुपारी एक वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्रज्योत हरिहर बंडोळे, (वय २० वर्षे, रा. शांतीनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो बी.कॉम.च्या द्वितीय वर्षाला शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी त्याचे अल्पवयीन पीडितेशी सुत जुळले. ते एकमेकांना भेटू लागले. त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केले.

यादरम्यान त्याने तिचे अनेक अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ काढून घेतले. मात्र, तिने लग्नासाठी विचारणा केल्यावर प्रज्योतने टाळाटाळ सुरू केली. याशिवाय अल्पवयीन असल्याने लग्न करता येणार नाही, असेही सांगितले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात झालेल्या भांडणानंतर प्रज्योतने पीडितेला तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. (Latest Marathi news)

मी जे सांगेल ते करावे लागेल, असेही तो म्हणाला. मात्र, तिने नकार दिल्याने प्रज्योतने तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो वडिलांच्या मोबाईलवर टाकले. ही बाब कळताच, पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सोसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

पळून जाण्याचा प्रयत्न फसला

प्रज्योतची बहीण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून ती पुण्याला राहते. दरम्यान शनिवारी (ता.९) ती पुण्याला जाणार होती. तिच्यासोबत प्रज्योतनेही जाण्याचा मनसुबा आखला होता. त्यानुसार तो जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या वडिलांचे अभियांत्रिकी वर्क्सचे काम आहे. त्यातून ते मुलांचे पालनपोषण करतात. (Latest Marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT