WTC Point Table : पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया होणार फायनल? कांगारूंनी न्यूझीलंडविरूद्धची मालिका 2-0 ने जिंकताच बदललं समीकरण

WTC Point Table NZ vs AUS
WTC Point Table NZ vs AUSesakal

WTC Point Table NZ vs AUS : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 असा विजय मिळवला. यानंतर टेस्ट चॅम्पियनशिप रँकिंगम 2023-25 मध्ये मोठा बदला झाला आहे. कांगारूंनी किवींना व्हाईट वॉश दिल्यानंतर कांगारूंना गुणतालिकेत फायदा झाला आहे.

मात्र भारत अजूनही अव्वल स्थानावरच असून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. पहिली WTC फायनल हा भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाली होती. तर दुसरी फायनल ही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाली. दोन्हीवेळा भारताला पराभव सहन करावा लागला होता.

WTC Point Table NZ vs AUS
ICC Champions Trophy 2025 : भारतीय संघ पाकिस्तानात खेळणार... ICC मिटिंगसाठी पीसीबी करतय प्लॅनिंग?

यंदाच्या 2023-25 WTC मध्ये सध्याची गुणतालिका पाहता वरच्या तीन संघांपौकी दोन संघातच फायनल होण्याची शक्यता आहे. जून 2025 मध्ये यंदाच्या सायकलची फायनल इंग्लंडमध्ये खेळवली जाणार आहे. नियमानुसार एका संघाला कसोटी जिंकल्यानंतर 12 गुण मिळतात. सामना टाय झाला तर 6 अन् अनिर्णित राहिला तर 4 अंक मिळतात.

प्रत्येक संघ wtc सायकलमध्ये कमी जास्त कसोटी सामने खेळत असते. त्यामुळे रँकिंगचा निर्णय हा पाईंट्सच्या आधारे होतो. याचबरोबर षटकांची संथ गती राखली तर गुण कमी देखील केले जातात. यामुळे या WTC सायकलमध्ये इंग्लंड तीन कसोटी विजय मिळवून देखील फक्त 21 गुणांवरच आहे.

WTC Point Table NZ vs AUS
खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचे वर्चस्व

भारत अव्वल

कसोटी मालिकेत इंग्लंडला 4-1 ने पराभूत करून भारत अव्वल स्थानावर आहे. पुढील काही महिने तो अव्वल स्थानावर राहील. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेनंतर काही दिवस कसोटी क्रिकेट खेळले जाणार नाही. या चक्रात भारताला अजून 3 कसोटी मालिका खेळायच्या आहेत. यातील 2 मालिका देशांतर्गत असतील.

सप्टेंबरमध्ये बांगलादेशसोबतच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडसोबत 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

(Cricket News In Marathi)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com