अत्याचार  sakal
नागपूर

Nagpur Crime : अल्पवयीन मुलीवर बेशुद्धीनंतर अत्याचार; गुंगीचे औषध पाजल्याचा पीडितेचा आरोप

रस्त्यात दोघेही एका ज्यूस सेंटरवर थांबले. त्याठिकाणी त्यांनी ज्यूस घेतला. ज्यूस पिताच अल्पवयीन मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला संशयित स्वप्नीलने एका लॉजवर नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. ही बाब ती शुद्धीवर आल्यानंतर मुलीच्या लक्षात आली.

सकाळ डिजिटल टीम

अमरावती - अंजनगावसुर्जी ठाण्याच्या हद्दीतील एका घटनेत अल्पवयीन मुलीला ज्यूसमधून बेशुद्धीचे औषध पाजून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला, असा गंभीर आरोप पीडितेने तक्रारीत केला. त्याआधारे पोलिसांनी युवकाविरुद्ध अत्याचार, विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

स्वप्नील भुजंगराव रोकडे (वय ३२, रा. धनेगाव), असे अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या संशयित युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वप्नीलचे पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी येणे-जाणे होते. त्यातून त्याची ओळख अल्पवयीन मुलीसोबत झाली. ऑगस्ट २०२२ मध्ये संशयिताने त्याच्या आईवडिलांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगून तिला गावी नेण्याचा बहाणा करून स्वत:च्या दुचाकीवर बसवून नेले.

रस्त्यात दोघेही एका ज्यूस सेंटरवर थांबले. त्याठिकाणी त्यांनी ज्यूस घेतला. ज्यूस पिताच अल्पवयीन मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला संशयित स्वप्नीलने एका लॉजवर नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. ही बाब ती शुद्धीवर आल्यानंतर मुलीच्या लक्षात आली. सदर घटनेबाबत कुणाला सांगितल्यास पीडितेला तसेच आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी त्याने मुलीस दिली.

त्यानंतर १८ मार्च २०२३ रोजी पीडित मुलीस संशयित स्वप्नीलने सातेगाव फाट्यावर असताना लग्न न केल्यास आईवडिलांना मारण्याची धमकी दिली होती. सतत वाढत्या दबावामुळे पीडितेने घटनेची माहिती आपल्या आईवडिलांना दिली. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, संशयित स्वप्नील रोकडेने त्यांनाही धमकी दिली, असा आरोप पीडित मुलीने तक्रारीत केला. त्याआधारे अंजनगावसुर्जी पोलिसांनी संशयित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दिवाळीआधी सोनं 7 हजारांनी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारातही सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; आजचा ताजा दर किती?

Kieron Pollard Mumbai Indians New Head Coach : ट्वेंटी-२०त १५००० धावा अन् ३४१ विकेट्स... मुंबई इंडियन्सकडून नव्या प्रशिक्षकाची घोषणा; कोण आहे जयवर्धनेचा उत्तराधिकारी?

प्रभासच्या 'फौजी' चित्रपटात झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; सध्या गाजवतोय झी मराठीची मालिका, पाहून प्रेक्षक खुश

Crime News: गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया अमेरिकेत FBI कडून अटक; भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?

SCROLL FOR NEXT