Nagpur Crime
Nagpur Crime  Esakal
नागपूर

Nagpur Crime: पैसे देण्याच्या बहाण्याने मुलीचे अपहरण, पोलिसांच्या प्रयत्नाने मुलगी सापडली; कळमन्यातील खळबळजनक घटना

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Girl Abduction Case: कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुलशननगरात दहा वर्षीय मुलीचे पैसे देण्याच्या बहाण्याने दोघांनी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास अपहरण केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवीत अपहरणकर्त्यांना अटक करीत मुलीची सुटका केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० वर्षीय मुलीच्या आई-वडिलांचा गुलशननगर भागात कापड विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी दुपारी मुलगी व तिचा १२ वर्षीय भाऊ दुकानात होते. यावेळी एक युवक तेथे आला. त्याने कापड खरेदी केले. पैसे मित्राजवळ आहे. चल तुला पैसे देतो, असे म्हणत तो मुलीला काही अंतरापर्यंत सोबत घेऊन गेला. तेथे त्याचा साथीदार मोटारसायकलवर होता.

त्याने बळजबरीने मुलीला मोटारसायकल बसविले. दरम्यान, बहीण न परतल्याने मुलाने शोध घेतला. मुलीच्या वडिलांनी कळमना पोलिसांना अपहरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घेतला असता, मुलगी भांडेप्लॉट परिसरात आढळली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

अंमलदारामुळे टळली मोठी घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्करदरा परिसरातून एक अंमलदार जात असताना, त्यांना दुचाकीवर एक मुलगी रडताना आढळली. त्यांनी त्याचा पाठलाग करून भांडेप्लॉट चौकात त्यांना अडविले आणि विचारपूस केली. तेव्हा उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने दोघांनाही पकडून पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहचून दोघांनाही अटक करीत, मुलीला ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live Latest News : राज्यात आज-उद्या या भागात मेघगर्जनेसह पाऊसाची शक्यता

Rahul Dravid: अमेरिकेत आंबेडकरांच्या विद्यापीठात पोहचले द्रविड आणि आगरकर, पुतळ्याला केले अभिवादन

Raveena Tandon: "डॅशकॅम आणि सीसीटीव्ही..."; व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अखेर रवीनानं सोडलं मौन

Ganeshkhind Road Traffic : गणेशखिंड मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; नागरिकांची गैरसोय, 'या' कारणामुळं होतेय पुण्यात कोंडी

Police Recruitment : मैदानी चाचण्यांची सोमवारपासून शक्यता; पोलिस भरती प्रक्रियेला प्रारंभ; पूर्वतयारीसाठी सज्जता

SCROLL FOR NEXT