नागपूर

Nagpur Fraud: मित्रानेच केला मित्राचा विश्वासघात! फ्लॅट देण्याच्या बहाण्याने केली ५० लाखांची फसवणूक

चार माळ्याच्या अपार्टमेंटमध्ये भागीदारी देण्याच्या नावावर रेस्टॉरेंट मालकाची दोन भावांनी ५० लाखांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Fraud Case: चार माळ्याच्या अपार्टमेंटमध्ये भागीदारी देण्याच्या नावावर रेस्टॉरेंट मालकाची दोन भावांनी ५० लाखांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रोहित विश्वासराव देशमुख (वय ३१ रा. फ्रेंड्स कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी ‘मेसर्स फोर वॉल कन्स्ट्रक्शन कंपनी’च्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.


चिराग संजय भुत व संजय मनोहर भुत (दोघेही रा. श्रीमंगल अपार्टमेंट गोरेपेठ) अशी आरोपींची नावे आहेत. रोहितचे ऑफिसर्स क्लबमध्ये रेस्टॉरेंट आहे. चिराग हा त्याचा वर्गमित्र आहेत. २०१२ मध्ये चिरागने रोहितसोबत भागीदारीत व्यवसाय करण्याचा करार केला. चिरागने बोरगाव येथे चार माळ्यांच्या अपार्टमेंटमध्ये आठ फ्लॅट बांधायचे असल्याचे रोहितला सांगितले.

दरम्यान, २०१५ ते २०१६ या कालावधीत रोहितने चिरागच्या कंपनीत ४८ लाख रुपये जमा केले. याशिवाय दोन लाख रुपये रोख दिले. मात्र चिरागचा आर्थिक व्यवहार योग्य नसल्याने त्यांनी भागीदारी तोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रोहितने चिरागला पैसे परत मागितले. परंतु चिरागने पैसे नसून बोरगावमधील मनोहर विला येथील फ्लॅट नावे करून देतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने रोहितच्या नावे फ्लॅट करून दिला. मात्र ताबाच दिला नाही. (Latest Marathi News)

चौकशी केली असता, हा फ्लॅट ‘दी धरमपेठ महिला मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’मध्ये गहाण ठेवल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे रोहितने फसवणुकीची तक्रार गिट्टीखदान पोलिसांत दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT