nagpur news  sakal
नागपूर

Nagpur News : देव्हाऱ्यातून देव चोरले, देवदूतांनी परत आणले

दोन चोरट्यांना अटक; महिलेने मानले धंतोली पोलिसांचे आभार

मंगेश गोमासे

नागपूर - घरातील देव्हाऱ्यात पिढीजात असलेल्या देवांची पूजा करणाऱ्या एका कुटुंबाच्या घरातून त्यांचे देवच चोरीला गेल्यास त्यांच्या मनाची अवस्था काय होते, असे हे देवच जाणे. अशीच परिस्थिती धंतोली पोलिस ठाणे परिसरातील रामकृष्णनगर येथे राहणाऱ्या जोशी परिवारावर ओढविली.

चोरट्याने केलेल्या घरफोडीत चक्क देव्हाऱ्यातून देवांची चोरी करून पसार झाला. मात्र, कुटुंबियांच्या देवाप्रती असलेल्या श्रद्धा बघून पोलिसांनी काही दिवसात चोरट्यास जेरबंद करीत, देवदुताप्रमाणे त्यांचे देव परत आणून दिले.

धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामकृष्णनगर येथे स्वप्नील मधुकर जोशी हे आयटी कंपनीत उच्चपदावर आहेत. त्यांच्या कुटुंबाची देवावर श्रद्धा असल्याने कुटुंबात कोणताही कार्यक्रम असो, मात्र, घरच्या देवांसाठी त्यांची आई सतत घरीच राहायचा.

त्यातून अनेकदा त्यांची आई या बाहेरगावी नातेवाईकांकडेही जात नव्हत्या. मात्र, पुण्याला आपल्या मुलाकडे त्या गेल्या असताना त्यांच्या घरात २० जुलैला चोरट्याने शिरुन त्यांच्या घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह देव्हाऱ्यातील देवपाटासह पितळ, चांदी आणि अष्टधातूने तयार केलेल्या देवांच्या मूर्तींचीही चोरी केली.

त्यामुळे त्यांची मनस्थितीच बिघडली. याबाबत त्यांनी धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदविली. ‘एकवेळ दागिने गेले तरी जाऊ द्या पण आमचे देव परत आणून द्या’ अशी विनवणी ते वांरवार पोलिसांकडे करीत होते. त्यांची देवाप्रती असलेली श्रद्धा बघून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.बी. चौधरी यांच्या पथकाने चोरट्याच्या शोधास सुरुवात केली. काही दिवसातच किशन बने (वय २८) आणि प्रितम उर्फ उमाशंकर शर्मा या दोन आरोपींना अटक करीत, त्यांच्याकडून चोरीला गेलेले सर्व देव आणि दागिने हस्तगत केले. दरम्यान ही माहिती जोशी कुटुंबियांना मिळताच, त्यांनी पोलिस ठाणे गाठून पोलिसांचे आभार मानत, देवदुतासारखे देव परत आणल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत, जोशी कुटुंबियांना त्यांचे देव परत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

Latest Marathi Update : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रमुख सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Delhi Protest: आई, मला खूप मारलेय! दिल्लीतील आंदोलनात नागपूरच्या तरुणाईचा हुंकार; मारो सर, मारे असे म्हणत पोलिसांचा मार केला सहन

तंबाखू नियंत्रणाच्या नियमांत होणार मोठा बदल? FDAच्या निर्णयामुळे भारतात खळबळ, तज्ज्ञांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT