Mumbai News : जमीनीच्या वादातून नेवाळीत शेतातच चुलत भावंड आपापसात भिडली

जमिनीच्या वादातून नेवाळीत एकाच कुटुंबातील भावंड आपापसात भिडले आहेत.
mumbai news
mumbai news sakal

डोंबिवली - जमिनीचा वाद आधी सोडवा नंतर भात लावण करा असे म्हणताच चुलत भावंडात जोरदार राडा झाला. एकमेकांची डोकी फोडण्यापर्यत

हा वाद गेला असून यात अशोक जाधव व कृष्णा जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात 4 जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी किशोर व सूरज जाधव या दोघांना अटक केली आहे.

जमिनीच्या वादातून नेवाळीत एकाच कुटुंबातील भावंड आपापसात भिडले आहेत.

नेवाळी गावातील जाधव कुटुंबियांत गेल्या काही महिन्यांपासून जमिनीचे वाद सुरू आहेत. शुक्रवारी कृष्णा व अशोक हे रस्त्याने जात असताना त्यांना चुलत भाऊ हे शेतात भात लावणं करताना दिसले.

अशोक यांनी आधी शेतीचा विषय क्लिअर करा मग शेतामध्ये लावण करा असे सांगितले. याचा राग आल्याने सूरज याने शिवीगाळ करत लोखंडी रॉड घेऊन येऊन अशोक यांच्या डोक्यात मारली.

mumbai news
Udyan Express:Udyan Express: चालत्या ट्रेनमधून तरुणीला बाहेर फेकले,मुंबई-पुणे उद्यान एक्स्प्रेसमधील प्रकार..कारण धक्कादायक

तर किशोर जाधव याने कृष्णा याना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये अशोक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर कृष्णा हे देखील जखमी झाले असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

mumbai news
Jalna Maratha Andolan : 'मराठा समाजाला डिवचाल तर हिशेब चुकता करू'; पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे कोल्हापुरात पडसाद

कृष्णा यांच्या तक्रारीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात किशोर जाधव, सूरज जाधव, सपना जाधव व फुलवंता जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पडवळ यांनी सूरज व किशोर यांना तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान या मारहाणीचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com