Neither planning nor concrete action There is no data on non-corona patients 
नागपूर

महापालिकेचा गोंधळ : ना नियोजन ना ठोस कृती; बिगरकोरोना रुग्णांचा डाटाच नाही

राजेश प्रायकर

नागपूर : शहरात दररोज तीन हजारांवर बाधित आढळून येत आहेत. यात एक हजारांवर विविध आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना तत्काळ उपचार मिळण्याची गरज आहे. परंतु, महापालिकेकडे त्यांचा ‘डाटा’च नाही. त्यामुळे उपचारास विलंब होत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. महापालिकेच्या नियोजनशून्यतेची किंमत नागरिकांना मोजावी लागण्याची शक्यता बळावली आहे.

शहरावर कोरोनाने फास आवळला आहे. दररोज तीन हजार बाधित आढळून येत आहेत. या रुग्णांचा डाटा गोळा करून त्यातील विविध आजारांनी ग्रस्त, ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगळी काढून त्यांना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी महापालिकेने नियोजन करण्याची गरज आहे. परंतु, दररोज आढळून येणाऱ्या बाधितांच्या संख्येच्या नोंदीपलीकडे महापालिकेचे कुठलेही नियोजन नसल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेचे अधिकारी कुठल्या भागात किती रुग्ण आहेत, त्यातील विविध आजारांनी ग्रस्त, ज्येष्ठ नागरिक किती, याबाबतचे विश्लेषणच करीत नसल्याने तत्काळ उपचाराची गरज असलेल्यांना वेळेत उपचार मिळत नसल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर नमूद केले. यातून मृत्यूची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. किंबहुना, काही जणांचा यातूनही मृत्यू झाल्याचे समजते. दररोज वाढत्या मृत्युसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी बाधितांची संख्या, मोठ्या प्रमाणात बाधित असलेला परिसर, बाधितांचे वय, त्यांचे आजार याबाबतचे विश्लेषण करणे गरजेचे असल्याचेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

मुंढे पॅर्टनची आठवण

मागील मे, जून, जुलैमध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बाधितांची संख्या, परिसर, त्यांचे वय, आजार याबाबत दररोज विश्लेषण करणारी एक टीमच तयार केली होती. या विश्लेषणातून ज्या भागात विविध आजारांनी ग्रस्त किंवा ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात होते, त्यांना तत्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविले जात होते. त्यांची आठवण आजही अधिकारी काढतात.

सर्वेक्षण सुरू करण्याची गरज

गेल्यावर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांचे सर्वेक्षण केले होते. इतर आजार झालेल्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्यास त्यांना तत्काळ सुविधा मिळावी हा हेतू होता. पण सध्या हे सर्वेक्षण बंद आहे. ते पुन्हा सुरू करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 

संपर्क क्रमांकही नाही

बाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची किंवा उपचाराची गरज पडली तर महापालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्याला फोन करायचा, याबाबत अद्याप महापालिकेने संपर्क क्रमांक जाहीर केले नाहीत. तसे महापौरांनी निर्देशही दिले. पण काहीच झाले नाही. यातून महापालिकेचा कोडगेपणा अधोरेखित झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT