esakal | आत्महत्येपूर्वी दीपालीने पतीला लिहिले भावनिक पत्र; ‘तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जातेय’
sakal

बोलून बातमी शोधा

Before committing suicide Deepali wrote an emotional letter to husband Amravati deepali news

जगातला सगळ्यात चांगला नवरा तू आहेस. माझ्यावर खूप प्रेम करतोस... मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याच त्रास देन कमी झालं नाही.

आत्महत्येपूर्वी दीपालीने पतीला लिहिले भावनिक पत्र; ‘तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जातेय’

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : मेळघाट हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी एकूण तीन सुसाईट नोट लिहल्याचं समोर आले आहे. पहिले पत्र अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना तर दुसरे पतीला आणि तिसरे आई शकुंतला चव्हाण यांच्या नावे आहे. हे तिन्ही पत्र धारणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपालीने पती राजेश मोहिते यांना लिहिलेले अतिशय भावनिक पत्र... 

प्रिय नवरोबा,
लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला पत्र लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जास्त कारण आता मी जीव देत आहे...

अधिक माहितीसाठी - ...अन् नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी, हिरव्या मंडपातूनच निघाली अंत्ययात्रा

साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत. तू नेहमी म्हणतोस माझी हार्डडिस्क भरली आहे. खरंच भरली आहे. साहेबाने मला पागल करून सोडलय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात... मी खूप सहन केलं पण, आता माझी लिमिट खरच संपली आहे... यावर उपाय असू शकतो.

मी सुट्टी घेऊ शकते पण, सुट्टी देखील तो मंजूर करीत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होत. मी तुझी वाट पाहत होते घरी यायची... आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा तू आहेस. माझ्यावर खूप प्रेम करतोस... मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याच त्रास देन कमी झालं नाही.

घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब

मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं... मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे... आपल्या संसाराला नजर लागली.. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण, आज मी तुला सोडून जात आहे.

माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार गुगामलचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यास धरावे. त्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे. आपला संसार अपूर्ण राहिला. पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे. माझी हार्डडिक्स फुटत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. मला माफ कर. माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार शिवकुमार आहे...
दीपाली...

loading image
go to top